5G Spectrum Auction : एक लाख कोटींचीही अपेक्षा नव्हती, कमाई पोहोचली 1.49 लाख कोटींवर; 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया अजून बाकी!

5G स्पेक्ट्रम लिलावाच्या (Auction) नवव्या फेरीनंतर 1,49,454 कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या. सरकारच्या म्हणण्यानुसार, बोलींमधून मिळणारी कमाई अपेक्षेपेक्षा जास्त आहे. मंगळवारी बोलीच्या चार तर बुधवारी नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या.

5G Spectrum Auction : एक लाख कोटींचीही अपेक्षा नव्हती, कमाई पोहोचली 1.49 लाख कोटींवर; 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया अजून बाकी!
5G, प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jul 27, 2022 | 8:30 PM

नवी दिल्ली : 5G स्पेक्ट्रमच्या (5G Spectrum) लिलावाची प्रक्रिया बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. मंगळवारी पहिला दिवस होता. दुसऱ्या दिवशी सरकारला स्पेक्ट्रम विक्रीसाठी 1.49 लाख कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या आहेत. सरकारने सुरुवातीला 80,000 कोटी ते 1,00,000 कोटी रुपयांच्या कमाईचा अंदाज व्यक्त केला होता. स्पेक्ट्रम विक्रीतून मिळणारी कमाई देखील अंदाजापेक्षा जास्त आहे. कारण 2015मध्ये सरकारने स्पेक्ट्रम विक्रीतून 1.09 लाख कोटी रुपये कमावले होते. यावेळी विक्रम मोडीत निघाल्याचे दिसत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी बोलीनंतर सांगितले, की 5G स्पेक्ट्रमचा लिलाव गुरुवारी तिसऱ्या दिवशीही सुरू राहणार आहे. 5G स्पेक्ट्रम लिलावाच्या (Auction) नवव्या फेरीनंतर 1,49,454 कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या. सरकारच्या म्हणण्यानुसार, बोलींमधून मिळणारी कमाई अपेक्षेपेक्षा जास्त आहे. मंगळवारी बोलीच्या चार तर बुधवारी नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या. पुढील कामकाज गुरुवारी पुन्हा सुरू राहणार आहे.

स्पेक्ट्रमची विक्री सुरूच राहणार

संपूर्ण कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, दुसऱ्या दिवशी, सरकारला बोलींमधून 1,49,454 कोटी रुपये मिळाले आहेत आणि आताही स्पेक्ट्रमची विक्री सुरूच राहणार आहे. ही प्रक्रिया गुरुवारीही सुरू राहणार असल्याचे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. अश्विनी म्हणाले, की 700 मेगाहर्ट्झ बँड ही मोबाइल कंपन्यांची सर्वाधिक पसंती आहे. हा बँड नुकताच विकला गेला आहे. तर कमी आणि मध्यम बँडमध्येही कंपन्या चांगली रुची दाखवत आहेत.

उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल व्यक्त केला आनंद

लिलावाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी स्पेक्ट्रम बोलीची चौथी फेरी पूर्ण झाल्यानंतर सरकारला 1.45 लाख कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या होत्या. बुधवारी ही रक्कम 1.49 लाख कोटींच्या पुढे गेली. या लिलावात एकूण 72 GHzसाठी 4.3 लाख कोटी रुपयांच्या बोली लावल्या जात आहेत. 5G स्पेक्ट्रमसाठीही हा पहिला लिलाव आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पहिल्याच दिवशी स्पेक्ट्रम लिलावाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले, की ते अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आहे आणि 2015च्या विक्रमाला मागे टाकण्याची शक्यता आहे. त्यावेळी सरकारला स्पेक्ट्रम विक्रीतून 1.09 लाख कोटी रुपये मिळाले होते.

हे सुद्धा वाचा

एकही खरेदीदार मिळाला नव्हता

दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी 700 मेगाहर्ट्झ बँडसाठी देखील बोली लावण्यात आली आहे, ज्यासाठी 2016 आणि 2021च्या मागील लिलावांमध्ये एकही खरेदीदार मिळाला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, लिलावाच्या पहिल्या दिवशी या स्पेक्ट्रम बँडसाठी 39,270 कोटी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें