Sambhu Raje Desai : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला, दोन-चार दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? काय म्हणाले, संभूराजे देसाई…

नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेली वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे की नाही हे मला माहिती नाही.

Sambhu Raje Desai : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला, दोन-चार दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? काय म्हणाले, संभूराजे देसाई...
दोन-चार दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? काय म्हणाले, संभूराजे देसाई...
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 6:35 PM

मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच राज्याचा राज्यकारभार हाकत आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आज पुन्हा मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळं यावेळी ते मंत्रिमंडळाची लिस्ट फायनल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात माजी मंत्री संभूराजे देसाई म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत. पण त्याला कारण देखील तशीच आहेत. मागे एकदा तत्कालीन राष्ट्रपतींच्या निरोप समारंभावेळी ते गेले होते. शिवाय आणखी काही कामानिमित्त गेले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत. ते काही नेत्यांना भेटणार आहेत. यावेळी कदाचित मंत्रिमंडळ विस्तारावर होऊ शकतो. दोन चार दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) होऊ शकतो. आम्ही सर्वस्वी अधिकार आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेले आहेत. कोणाला कोणतं खात द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सर्वस्वी ते ठरवतील, असं स्पष्टीकरण माजी मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिलं.

पाहा व्हिडीओ

रामदास कदम ज्येष्ठ नेते

संभूराजे देसाई म्हणाले, रामदास भाई आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेक वर्षे शिवसेनेत काम केलेले आहे. आपण समाजासाठी काम करत असताना एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर ती गोष्ट बोलणं साहजिकच आहे. रामदास भाई यांचे काही वैयक्तिक अनुभव असतील तर ते बोलले असतील.

नारायण राणेंनी अनुभव व्यक्त केले असतील

आम्ही आमचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलं होत की, उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी टीका करू नये. पण नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेली वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे की नाही हे मला माहिती नाही. पण राणे यांना तसे काही अनुभव आले असतील तर ते बोलले असतील, असंही संभूराजे देसाई यांनी सांगितलं.