मुंबईत भरधाव कारची फूटपाथवरील पादचाऱ्यांना धडक, 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू
भरधाव वेगात असलेल्या अॅक्सेंट कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारने वाहनांना उडवत फूटपाथवरील तिघींना धडक दिली.

मुंबई : भरधाव कार फूटपाथवर चढून झालेल्या अपघातात 23 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात काल रात्री (शुक्रवार 6 डिसेंबर) हा अपघात घडला. अपघाताच्या वेळी कारचालक मद्याच्या अंमलाखाली असल्याचा आरोप (Chunabhatti Car Accident) आहे.
चुनाभट्टी परिसरात राहणारी 23 वर्षीय अर्चना पार्ठे काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास फूटपाथवरुन चालत होती. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या अॅक्सेंट कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार अनेक वाहनांना उडवत थेट फूटपाथवर गेली. त्यावेळी मार्केटमध्ये जाणाऱ्या तिघी जणींना कारची जोरदार धडक बसली.
ही धडक इतकी जबरदस्त होती, की अर्चनाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी कारचालकाने मद्यप्राशन केल्याचा दावा केला जात आहे.
लग्नाच्या हॉलमधून 17 तोळे सोनं चोरीला, शिर्डीत धक्कादायक प्रकार
दरम्यान, चुनाभट्टी पोलिस चौकीला पार्ठे कुटुंबाने घेराव घालत ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत वाहन चालकाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृत्यू अर्चना पार्टेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आणि चुनाभट्टीतील रहिवाशांनी नकार दिला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती असून चुनाभट्टी पोलिस (Chunabhatti Car Accident) या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.