AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळ दारावर; मुंबई, पुण्यासह राज्यातील या शहरांवर पाणी कपातीचे संकट, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Maharashtra Drought Water Cuts: राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. जून-जुलैनंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. तर सप्टेंबरमध्ये डोळे वटारले. त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होत आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी पाणी टिकवून ठेवण्यासाठी आतापासूनच शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.

दुष्काळ दारावर; मुंबई, पुण्यासह राज्यातील या शहरांवर पाणी कपातीचे संकट, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
राज्यातील अनेक शहरांवर पाणी कपातीचे संकट
| Updated on: Oct 15, 2026 | 10:01 AM
Share

Maharashtra Drought Water Cuts: राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील मोठ्या धरणातील पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत टिकवण्याचे मोठे आवाहन आहे. यामुळे राज्यातील प्रमुख महानगरांसह तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पाणी कपातीचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी या परिस्थितीत पाणी जपून वापरण्याचा आणि पाण्याची नासाडी न करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्यातील अनेक शहरात पाणी कपात लागू झाली आहे.

पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू

पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना पाणी नियोजन करावे लागणार आहे. कमी पर्जन्यमान आणि भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी जपण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत १२ ऑक्टोबर रोजी २६.२२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. पावसातील खंड,पाण्याची वाढती मागणी आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणी वापर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम होणार आहे

दर गुरुवारी: संपूर्ण पुणे शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन

शुक्रवार आणि शनिवार: पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब किंवा कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.

बांधकामासाठी पिण्याचे पाणी: वापरण्यास बंदी.वाहन धुण्याची केंद्रे: बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाण्याची नासाडी: रोखण्यासाठी महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत पाणी कपात

परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्याने मुंबईत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, आतापासूनच पाणी कपात सुरू झाली आहे. बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांना बसत असून, वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाअभावी दुष्काळाचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता असून, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासही सुरुवात केली आहे.

नवी मुंबईकरांवर पाणी कपातीच संकट

नवी मुंबईकरांवर पाण्याच संकट ओढवलंय.. येत्या शुक्रवारपासून नवी मुंबईत पाणी कपात सुरू होणार आहे.. पहिल्या टप्प्यात १० टक्के तर दुसऱ्या टप्प्यात कपातीची टक्केवारी वाढणार आहे.. फक्त मार्च महिन्यापर्यंत असलेला पाणी साठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरवायचं असल्याने पाणी कपातीच धोरण महापालिकेने अवलंबलं आहे.

नाशिककरांच्या पाणीकपातीचा फैसला १५ ऑक्टोबरनंतर!

नाशिक महापालिकेने शहरासाठी आणि कुंभमेळ्यासाठी मिळून सुमारे ८ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. १५ ऑक्टोबरनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाणी आरक्षणाची बैठक होणार आहे. गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणातून पाणी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणीनुसार पाणी कोटा मंजूर न झाल्यास नाशिकमध्ये पाणीकपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळणार की पाणीकपातीला सामोरं जावं लागणार, याकडे लक्ष लागलं आहे.

नंदुरबारच्या नागरिकांनी पाण्याची नासाडी थांबवा

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात सध्या ८५.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरावर तूर्तास पाणीकपातीचे संकट दिसून येत नाही. मात्र, शहरात अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास येत असून, पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. सध्या नंदुरबार शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून, प्रत्येक वेळी सुमारे एक तास पाणी सोडले जात आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत १५ मिनिटांची कपात करण्यात आल्याने शहरातील अनेक भागांमध्ये त्याचे परिणाम जाणवत आहेत. धरणात समाधानकारक पाणीसाठा असला, तरी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याची नासाडी थांबवून पाणी जपून वापरावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

९०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांना ‘ब्रेक’

दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे नागपुरातील ९०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांना ‘ब्रेक’ लागला आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाने याविषयीचा मोठा निर्णय घेतला आहे. अपुरा पाऊस, पाण्याची वाढती मागणी, तापमानवाढ आणि धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती मनपाने ठोस पावलं टाकलं आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उद्यानांसाठी आणि बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शहरात पाचव्या टप्प्यात ९०० कोटी रुपये खर्चुन सिमेंट रस्ते बांधण्याचे नियोजन होते. ते थांबवण्यात आले आहे.

Follow Us
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....