AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest : 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प, 50 हजार जेनजी; सीजेपीचा प्लान काय?

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कथित निवडणूक घोटाळ्याविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) मुंबईतील शिवाजी पार्कात मोठे आंदोलन करत आहे. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात ५० हजारांहून अधिक Gen Z युवा सहभागी होणार आहेत. शांततापूर्ण आंदोलनासाठी २०० स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प आणि पाण्याची व्यवस्था केली आहे.

CJP Protest : 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प, 50 हजार जेनजी; सीजेपीचा प्लान काय?
abhijit dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 1:18 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने दंड थोपाटले आहेत. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात आज सीजेपीचं मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कात मोठं आंदोलन होणार आहे. या मोर्चाला एक दोन नव्हे तर 50 हजार जेनजी या मोर्चाला येणार आहे. केवळ मुंबई-महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हे आंदोलक शिवाजी पार्कात येणार असल्याचा दावा सीजेपीचे मुंबई कोऑर्डिनेटर प्रणय अहीर यांनी केला आहे.

आज आमचं आंदोलन शांततेत असणार आहे. लोकशाही वाचवण्यासाठी देशातील युवा आणि कोणत्याही वयाचा व्यक्ती तत्पर आहे. आज संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत आंदोलन होणरा आहे. आम्हाला लोकांचं समर्थन मिळत आहे. कमीत कमी 50 हजार लोक आंदोलनात येतील, अशी आशा आहे, असं सीजेपीच्या सदस्यांनी म्हटलं आहे.

कुणालाही त्रास होणार नाही

सीजेपीने 200 स्वयंसेवक तैनात केले आहेत. त्यांची यादी बनवली आहे. निदर्शनाच्या ठिकाणी मेडिकल कॅम्पही लावण्यात आले आहे. आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आंदोलकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची खबरदारी घेतली जातआहे, असं प्रणय अहीर यांनी सांगितलं.

पोलिसांचही सहकार्य

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आम्हाला सर्व सहकार्य मिळत आहे. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. कोणत्याही प्रकारचं हिंसक आंदोलन होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

दीपके, रांका मुंबईत

आंदोलनाच्या आदल्या दिवशीच म्हणजे काल अभिजीत दीपके आणि आशुतोष रांका मुंबईत पोहोचले आहेत. काल रात्री गेटवेवर दोघेही प्लेकार्डसाठी बसलेले दिसले. त्यानंतर दीपकेंना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी आली होती. मात्र, त्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याचं सांगितलं गेलं.

वांद्रे स्टेशनवर चहा

तर, अभिजीत दीपके आज सकाळी वांद्रे स्थानकारवर चहा पिताना दिसले. यावेळी चहा विकणाऱ्या व्यक्तीने त्यांचं कौतुक केलं. तुम्ही चांगलं काम करत आहात, असं तो म्हणाला. त्यावर तुम्ही 4 वाजता शिवाजी पार्कात येणार की नाही? असा सवाल दीपके यांनी या चहावाल्याला केला. यावेळी चहाच्या ठेल्यावर सीजेपीच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...