Video | क्लीनअप मार्शलची दादागिरी, हातात दगड घेऊन वसुली, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 29, 2021 | 8:14 PM

माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट रोडवर पुन्हा एकदा क्लीनअप मार्शल यांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. येथील एक मार्शल नियमामुसार आखून दिलेल्या दंडापेक्षा नागरिकांकडे जास्त रकमेची मागणी करत होता.

Video | क्लीनअप मार्शलची दादागिरी, हातात दगड घेऊन वसुली, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल
mumbai marshal
Follow us on

मुंबई : माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट रोडवर पुन्हा एकदा क्लीनअप मार्शल यांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. या भागात एक मार्शल नियमामुसार आखून दिलेल्या दंडापेक्षा नागरिकांकडे जास्त पैशांची मागणी करत होता. याच कारणामुळे नागरिक आणि क्लिनअप मार्शल यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर भांडणात झाल्यामुळे मार्शलने नागरिकांवर दगडफेकदेखील केली. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मार्शल नियमापेक्षा जास्त पैसे मागत होता

मिळालेल्या माहितीनुसार माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट रोडवर काही नागरिक उभे होते. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासाठी मार्शल आला. यावेळी मार्शल नागरिकांना नियमापेक्षा जास्त पैसे मागत होता. विशेष म्हणजे जाब विचारल्यानंतर त्याने नागरिकांसोबत वाद घालणे सुरु केले. त्यानंतर नागरिकांनी चोप दिल्यामुळे त्याने दगडफेक केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

वाद चिघळल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांकडून मध्यस्थीचा प्रयत्न

मास्क न वापरणाऱ्या लोकांविरुद्ध क्लीनअप मार्शल कारवाई करतात. मात्र, या मार्शलने थेट भांडण सुरु केल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे प्रकरण चिघळल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी मध्यस्थी करून क्लीनअप मार्शलला अडवण्याचा प्रयत्नदेखील केला.

पाहा व्हिडीओ :

मार्शलची दादागिरी कधी थांबणार ?

दरम्यान, घटनास्थळी येण्यास पोलिसांना उशीर झाल्यामुळे मार्शल आणि नागरिक यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा, महानगरपालिका व सरकार काही ठोस उपाय करणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

इतर बातम्या :

Mumbai School Reopen : मुंबईतल्या शाळा सुरु होणार, ‘या’ तारखेपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु, BMC चा मोठा निर्णय

आपल्याच नागरिकांच्या विमानाच्या लँडिंगला अमेरिकेचा नकार, काबुलवरुन विमान अमेरिकेत, पण नागरिक अजूनही विमानतळावर!

भाजपच्या गांधीगिरीची चर्चा, मुंबईतील खड्ड्यांचे फोटो प्रदर्शन भरवून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

(clash between mumbai chembur citizens and cleanup marshal video goes viral)