आपल्याच नागरिकांच्या विमानाच्या लँडिंगला अमेरिकेचा नकार, काबुलवरुन विमान अमेरिकेत, पण नागरिक अजूनही विमानतळावर!

काबूलमधून उड्डाण घेतलेल्या अमेरिकन चार्टर विमानाच्या लँडिंगला परवानगी नाकारली. फ्लाइट अटेंडंटच्या, 100 पेक्षा जास्त अमेरिकन नागरिक आणि ग्रीन कार्डधारक या विमानात होते.

आपल्याच नागरिकांच्या विमानाच्या लँडिंगला अमेरिकेचा नकार, काबुलवरुन विमान अमेरिकेत, पण नागरिक अजूनही विमानतळावर!
कॅम एअरच्या फ्लाइटमध्ये 28 अमेरिकन, 83 ग्रीन कार्डधारक आणि यूएस स्पेशल इमिग्रेशन व्हिसा असलेले 6 लोक होते.
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 7:20 PM

वॉशिंग्टन: अमेरिकेने मंगळवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून उड्डाण घेतलेल्या अमेरिकन चार्टर विमानाच्या लँडिंगला परवानगी नाकारली. फ्लाइट अटेंडंटच्या, 100 पेक्षा जास्त अमेरिकन नागरिक आणि ग्रीन कार्डधारक या विमानात होते. या सर्वांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आलं होतं. ( flights-with-americans-bars-by-us-from-kabul-says-a-report-jo beden govt)

दरम्यान, या विमानाला अमेरिकेच्या होमलँड विभागाकडून मान्यता न देण्याचा निर्णय घेण्यात आला. सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण एजन्सीच्या प्रोजेक्ट डायनॅमोचे संस्थापक, ब्रायन स्टर्न यांनी या प्रकरणावर अधिक माहिती दिली. ब्रायन म्हणाले की, ‘ अमेरिककन विभाग कोणत्याही आंतरराष्ट्रीय चार्टर फ्लाईटला अमेरिकेत येऊ देणार नसल्याचं म्हणत आहेत.’ स्टर्नने रॉयटर्स या वृत्तसंस्था ही माहिती दिली.

चार्टर्ड फ्लाईटमध्ये 117 प्रवासी

स्टर्न आपल्या सहकाऱ्यांसह या एअर चार्टर्ड फ्लाइटमध्ये होते. ही एक खाजगी अफगाण विमान कंपनी आहे. ब्रायनच्या मते, काबूलहून आल्यानंतर त्यांना अबू धाबी विमानतळावर 14 तास थांबावलं. अबू धाबीला पोहोचलेल्या विमानात 59 मुलांसह 117 लोक होते. ब्रायन यांचा ग्रुप अमेरिकेच्या लष्करासाठी अफगाणिस्तानात काम करत होता. असं असलं तरी, सध्या या बातमीवर अमेरिकेच्या होमलँड डिपार्टमेंटने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

बायडन प्रशासनाला कुठलीही माहिती नाही

दरम्यान, या घटनेबद्दल बायडन प्रशासनाला काहीही माहिती नसल्याचं समोर आलं आहे, एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर, ही माहिती दिली. अधिकाऱ्याच्या मते, अमेरिकेत दाखल होणाऱ्या चार्टर्ड फ्लाईट उतरण्यापूर्वी त्यांची कडक तपासणी केली जाते. त्यातच अफगाणिस्तानातून नागरिकांना सोडवण्याला अमेरिका प्राधान्य देतं. त्यामुळे हा प्रकार कशामुळे झाला, याबद्दल प्रशासनाला माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं.

विमानातील नागरिकांना घराची आस लागली

कॅम एअरच्या फ्लाइटमध्ये 28 अमेरिकन, 83 ग्रीन कार्डधारक आणि यूएस स्पेशल इमिग्रेशन व्हिसा असलेले 6 लोक होते. ब्रायन यांच्या मते, हे सर्वजण 20 वर्षांपासून अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्यासाठी काम करत होते. ते म्हणाले की, चार्टर्ड इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानात प्रवाशांना बसवण्याची त्यांची योजना होती. हे विमान न्यूयॉर्कमध्ये असलेल्या जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यास अखेर मान्यता देण्यात आली. पण यासाठी प्रशासनाने मुख्य हवाई पट्टीऐवजी, वॉशिंग्टनच्या बाहेर असलेल्या ड्युल्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याची परवानगी दिली. मात्र, अजुनही या विमानातील लोकांना अमेरिकेत प्रवेश मिळाले नाही.

हेही वाचा:

Afghanistan: सैन्य परत बोलावणं हे अमेरिकेचं सर्वात मोठं अपयश, US आर्मीच्या टॉप कमांडरकडून बायडन यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्हं

Japan: आधी परराष्ट्र मंत्री आता जपानचे नवे पंतप्रधान, जाणून घ्या कोण आहेत फुमियो किशिदा?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.