राहुल, सोनियाजी, आता बोला: मुख्यमंत्री

राहुल, सोनियाजी, आता बोला: मुख्यमंत्री

मुंबई: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी ख्रिश्चन मिशेलने सोनिया आणि राहुल गांधी यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे राहुल आणि सोनिया गांधींनी पुढे येऊन उत्तर द्यायला हवं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी ख्रिश्चन मिशेलने सोनिया आणि राहुल गांधी यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे राहुल आणि सोनिया गांधींनी पुढे येऊन उत्तर द्यायला हवं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

प्रत्येक घोटाळ्यात एकाच कुटुंबाचं नाव कसं येतं? मिशेलने नाव घेतलेलं मिसेस गांधी आणि R म्हणजे कोण? या प्रश्नांची उत्तरं राहुल आणि सोनिया गांधींनी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.  ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील 52 टक्के वाटा काँग्रेस नेत्यांना मिळाला. लाच घेण्यासाठी शेल अर्थात बनावट कंपन्या उघडल्या, असा दावा फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले, “ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणात काँग्रेसने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. ऑगस्टा वेस्ट लँड हेलिकॉप्टर प्रकरणात मोठा घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी चालवणारा परिवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे”.

“ऑगस्ट वेस्टलँडच्या 12 हेलिकॉप्टरसाठी 3200 कोटींचं टेंडर देण्यात आलं. मात्र या सौद्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं. त्यात काही नेत्यांना लाच दिल्याचं पुढे आलं. भारतातल्या लोकांना लाच देण्यात आली. शेल कंपनीच्या माध्यमातून ही लाच देण्यात आली. चोर चोर म्हणनारे राहुल गांधी यावर उत्तर देतील का” , असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

तपास यंत्रणांवर दबाव टाकल्याचा आरोप आमच्यावर होतो. मात्र हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं तेव्हा आमचं सरकार नव्हतं. ख्रिश्चन मिशेल वर ED ने गांधी परिवाराचं नाव घेण्यासाठी दबाव टाकला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

या प्रकरणाच्या माहितीसाठी इटलीतील न्यायालयाचे निकाल पाहा, त्यामध्ये सोनिया गांधींचं नाव आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

शरद पवारांवर टीकास्त्र

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. पवारांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही.एक चांगलं आहे त्यांना आता शरद पवार यांच्यासारखा एक वकील मिळाला आहे.  पण शरद पवारांनी हे माहीत आहे की यात भ्रष्टाचार झाला आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

राधाकृष्ण विखे पाटलांना नोटीस पाठवणार

विकास आराखड्यावरुन आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आजच मानहानीची नोटीस पाठवणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विखे पाटील यांनी बेछूट आरोप केले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जर DP प्लॅन कसा तयार होतो हे जर समजून घेतलं असतं, तर त्यांनी  हा प्रश्न विचारलाच नसता, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईच्या विकास आराखड्यात बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 1 लाख कोटी रुपये घेतल्याचा आरो, विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता.

संबंधित बातम्या 

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: मिशेलने राहुल, सोनियांचं नाव घेतल्याचा ED चा दावा 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें