ऑडिटनंतरही पूल कोसळला, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : मुख्यमंत्री

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार […]

ऑडिटनंतरही पूल कोसळला, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही भेट दिली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, शिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचाही खर्चही राज्य सरकारकडून केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्र्यांनी घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचे आदेश दिले. शिवाय पुलाविषयी आयुक्तांकडून माहिती घेतली. या पुलाचं गेल्या वर्षीच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. ऑडिटनंतरही पूल कोसळत असेल तर ही बाब गंभीर आहे. ऑडिटमध्येच दोष होता का याचीही चौकशी होईल आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.