Corona Positive Police | मुख्यमंत्र्यांचा पोलिसांसाठी प्लॅन B काय?

| Updated on: May 10, 2020 | 8:11 AM

कोरोनाच्या संकटकाळात लोकांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांभोवती कोरोनाचा विळखा वाढत आहे.

Corona Positive Police | मुख्यमंत्र्यांचा पोलिसांसाठी प्लॅन B काय?
Follow us on

मुंबई : कोरोनाचं संकट असतानाही, जीव मुठीत घेऊन पोलीस (CM Plan-B For Maharashtra Police) बांधव रस्त्यावर आहेत. मात्र, लोकांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांभोवती कोरोनाचा विळखा वाढत आहे. 9 मेच्या दुपारी 4 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा हा 714 वर (CM Plan-B For Maharashtra Police) पोहोचला आहे.

महाराष्ट्रात पोलिसांवर कोरोनाचं संकट आणखी गडद

गेल्या 24 तासांत 183 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्तांमध्ये 81 अधिकारी आणि 633 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 71 अधिकारी आणि 577 अशा एकूण 648 पोलिसांना कोरोनाची लक्षणं आहेत. 10 अधिकारी आणि 51 पोलीस कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्लॅन B

पोलिसांवरचा ड्युटीचा ताण आणि कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या पाहता, त्यांना आराम मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनीही पुढाकार घेतला आहे. मुंबईत लष्कर आणण्याची गरज नसून, पोलिसांना आराम देण्यासाठी केंद्राकडे मनुष्यबळाची मागणी करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनीही (CM Plan-B For Maharashtra Police) स्पष्ट केलं.

पोलिसांवरील हल्लेही वाढले

कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्याही वाढतच चालली आहे. तर, पोलिसांवर होणारे हल्लेही चिंताजनक आहेत. जीव धोक्यात टाकून ड्युटी करणाऱ्या पोलिसांना मारहाण सुरुच आहे. संचारबंदीत 194 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले आहेत. 689 हल्लेखोर नागरिकांना अटक झाली आहे. आतापर्यंतच्या हल्ल्यात 73 पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी झाला आहे.

दुसरीकडे, मुंबईतील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता, पुढील धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रातील रेल्वे, बीपीटी आणि मिलिट्री हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सचीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली आहे. एकंदरितच राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, सरकार तर पावलं उचलत आहे. मात्र, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं आपली सर्वांची (CM Plan-B For Maharashtra Police) जबाबदारी आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown effect | कोणाला झोप येईना, तर कोणाला झोपेतून उठवेना, अनेकांचा चिडचिडेपणा वाढला : मानसोपचारतज्ज्ञ

संगमनेरमध्ये एकाच दिवसात 7 कोरोना रुग्ण, नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 51 वर

नागपूरकरांनो प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडल्यास थेट विलगीकरण कक्षात रवानगी, तुकाराम मुंढेंचे आदेश

उल्हासनगर कोरोनाचा हॉटस्पॉट, वृद्ध महिलेच्या संपर्कातील 12 जण पॉझिटिव्ह