मुंबईतील ऑफिसचं काय करायचं? मुख्यमंत्र्यांची सूचना कंपन्या पाळणार?

| Updated on: Feb 21, 2021 | 8:37 PM

कारण नसताना होणारी गर्दीवर नियंत्रण होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. (Uddhav Thackeray Office Time Change)

मुंबईतील ऑफिसचं काय करायचं? मुख्यमंत्र्यांची सूचना कंपन्या पाळणार?
उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे ऑफिसमधील कामाच्या वेळेत बदल करणे गरजेचे आहे. वर्क फ्रॉम होम करायला हवं. यामुळे कारण नसताना होणारी गर्दीवर नियंत्रण होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी सात वाजता जनतेशी संवाद साधताना याबाबतचे वक्तव्य केले. महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी जनतेला विचारला आहे. (CM Uddhav Thackeray Big Statement Mumbai Office Time Change)

“काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची बैठक पार पडली. यात मी एक सूचना केली होती. यात ऑफिसच्या वेळा विभागणे ही महत्त्वाची सूचना होती. दिवसभरात 24 तास असतात, जर त्या 24 तासाची विभागणी केली. ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी वर्क फॉर्म होम केलं. त्यातही आपण तुकड्या केल्या पाहिजेत. यात एक टीम ऑफिसला येईल, दुसरी बॅच वर्क फॉर्म होम करेल, असे आलटून पालटून केले. तर कारण नसताना होणारी गर्दी नियंत्रणात ठेवू शकतो. वर्क फॉर्म होम आहे. ऑफिसच्या वेळा विभागणी करा. त्याचसोबतच त्रिसूत्री पाळा,” असे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नमूद केले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी याप्रमाणे आता मी जबाबदार अशी एक नवी मोहिम राबवायची आहे. मी जबाबदार आहे, असे प्रत्येकाने स्वत:ला सांगायचे आहे. घराबाहेर असताना मास्क घालेन, हात धुवणार, सॅनिटायझर हे त्रिसूत्री आहे. ती आपण विसरलो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

निती आयोगाच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे, त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असे मोठे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निती आयोगाच्या बैठकीत केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची सहावी बैठक पार पडली.

कल करे सो आज कर, आज करे सो अभी अशी राज्य शासनाची भूमिका आहे. कोविड काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही. सरकारकडून आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईची सद्यस्थिती काय? 

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 921 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

मुंबईतील कोरोना अपडेट 

24 तासात नवे रूग्ण – 921
24 तासात मृत्यू – 6
एकूण रूग्ण – 3,19,128
एकूण मृत्यू – 11,446
एकूण डीस्चार्ज – 3,00,959
अॅक्टीव्ह रूग्ण – 5859

राज्यात लॉकडाऊन लागणार?

राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जनतेवर सोडला आहे. पण त्यासाठी त्यांनी 8 दिवसाचं अल्टीमेटम दिलेलं आहे. म्हणजे आठ दिवसातून लोकांनी शिस्त पाळून, मास्क घालून कोरोनाला रोखलं तर कदाचित लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही. पण जी गंभीर स्थिती काही ठिकाणी होती आहे आणि ती तशीच पुढच्या आठ दिवस राहीली तर कदाचित महाराष्ट्रात लॉकडाऊनवर विचार होऊ शकतो असं अप्रत्यक्ष सुचित केलं आहे. (CM Uddhav Thackeray Big Statement Mumbai Office Time Change)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown Updates : सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायचा का? मुख्यमंत्र्यांचं जनतेला 8 दिवसांचं अल्टीमेटम

कोरोनाची दुसरी लाट धडका मारतेय, बंधनं घालावीच लागतील : मुख्यमंत्री