कोरोनाची दुसरी लाट धडका मारतेय, बंधनं घालावीच लागतील : मुख्यमंत्री

कोरोनाची दुसरी लाट ही दरवाज्यावर धडका मारतेय. ही लाट आत आलीय की नाही हे पुढच्या आठ-पंधरा दिवसात समजेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले (CM Uddhav Thackeray on corona second wave in Maharashtra).

कोरोनाची दुसरी लाट धडका मारतेय, बंधनं घालावीच लागतील : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 7:56 PM

मुंबई : “राज्यात सध्या कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 53 हजारांवर पोहोचली आहे. राज्यात आज जवळपास 7 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतही रुग्ण वाढले आहेत. गेल्या आठवड्याभरात रुग्णसंख्या डबल झाली आहे. ही परिस्थिती पाहता राज्यात दुसरी लाट आल्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट ही दरवाज्यावर धडका मारतेय. ही लाट आत आलीय की नाही हे पुढच्या आठ-पंधरा दिवसात समजेल. म्हणून मी हात जोडून विनंती करतोय, पुन्हा एकदा काही प्रमाणात बंधनं पाळावे लागणार आहेत”, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं (CM Uddhav Thackeray on corona second wave in Maharashtra).

“अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या पठ्ठ्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे उद्यापासून तिथे बंधनं घालत आहोत. अचानक लॉकडाऊन करणं घातक आहे. त्यामुळे तिथल्या जनतेला एक दिवस द्या. त्यानंतर रात्री आठ वाजेपासून बंधनं सुरु करा, असं अधिकाऱ्यांना सांगितलं आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क घालणं अनिवार्य: उद्धव ठाकरे

कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल आहे. तो घालायला विसरलो तर हा छुपा शत्रू आपल्यावर वार करू शकतो. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क घालणं अनिवार्य आहे.

राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती : उद्धव ठाकरे

राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केलीय. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

या लढाईत मास्क हीच आपली ढालः उद्धव ठाकरे

आम्ही आंदोलन केलं आणि एखादी गोष्ट उघडली. पण कोरोनाशी मुकाबला ते करू शकत नाही. उद्या कोरोनाचा घाला आलाच तर तेही आपल्याला वाचवू शकत नाही. त्यामुळे ज्या ज्या सूचना दिल्या त्याचं पालन आपण केलं. पण आता आपण मास्क वापरणं सोडलं आहे. या लढाईत मास्क हेच आपली ढाल आहे. या लढाईत मास दिसत नाही. त्यामुळे मास्क घालणं अनिवार्य आहे. या पूर्वीच्या काळात बेड्स, ऑक्सिजन बेड्ल नव्हते. त्यावेळी पोलीस, डॉक्टर देवदूतासारखे धावून आले.

लॉकडाऊन हा त्याचावर उपाय आहे की नाही?, तुम्हीच सांगाः उद्धव ठाकरे

पाश्चिमात्य देशांमध्ये तसंच झालं होतं. कोरोनाची लाट जेव्हा खाली येते तेव्हाच तिला थांबवायचं असतं. पाश्चिमात्य देशांमध्येही आपल्यासारखीच शिथिलता आणली. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याची वेळ आली. लॉकडाऊन हा त्याचावर उपाय आहे की नाही? माहिती नाही. पण संपर्कातून होणारा संसर्ग यातून थांबवता येऊ शकतो.

समजूतदारपणे सूचनांचं पालन करा, अन्यथा लॉकडाऊन?: उद्धव ठाकरे

कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजूतदारपणे सूचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचं असतं. पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन आहे.

संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय : उद्धव ठाकरे

संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. मंत्री नितीन राऊत यांनी घरचा विवाह सोहळा रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.

नियम मोडलेले दिसले तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होणारः उद्धव ठाकरे

जनतेच्या वतीनं तुमच्या मुलाला आशीर्वाद आहे. जर नियम मोडलेले दिसले तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होणार आहे, मास्क वापरला नाही तर दंड आकारला जाणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत.

उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी : उद्धव ठाकरे

उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी घालण्यात आलीय. पक्ष वाढवू, पण कोरोना नाही, पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावलाय.

तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल: उद्धव ठाकरे

आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, अंतर ठेवा, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

हेही वाचा : CM on Maharashtra Lockdown : सर्वसामान्यांना लस कधी मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.