कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींना विनंती

| Updated on: Mar 20, 2020 | 8:19 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहचू नये यासाठी उपाययोजनांची गती वाढवण्याची विनंती केली आहे (CM Uddhav Thackeray on Phase 3 Corona).

कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींना विनंती
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहचू नये यासाठी उपाययोजनांची गती वाढवण्याची विनंती केली आहे (CM Uddhav Thackeray on Phase 3 Corona). आपण सध्या कोरोनाच्या दुसऱ्या टप्यातील संक्रमण अवस्थेत आहोत. तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. आज (20 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरे यांना पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र कोरोना साथीच्या रोगाचा जोमाने मुकाबला करत आहे. सध्या कोरोना रोगाच्या दुसऱ्या टप्यातील संक्रमण अवस्था आहे. आपण तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल. विशेषत: चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज आहे.”


पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. महाराष्ट्र शासनाने देखील वेळीच पावलं उचलली आहेत. कोरोनाचं संक्रमण अधिक वाढू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. रुग्णांची संख्या कमी दिसत असली, तरी या रोगाच्या फैलावाचे स्वरुप पाहता भ्रमात राहण्यात अर्थ नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“आंतरराष्ट्रीय विमानांना भारतात प्रवेश बंद

उद्धव ठाकरे म्हणाले, “भारतात 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानं बंद करण्यात येणार आहेत. तोपर्यंत 20 ते 25 हजार प्रवासी देशात-राज्यात परततील. या प्रवाशांचे क्वारंटाईन करावे लागेल किंवा त्यांच्यावर उपचार करावे लागतील. त्यादृष्टीने सुविधा वाढवण्याची गरज आहे. मुंबई-पुणे-नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरलेले परदेशातून आलेले प्रवासी मिळेल त्या वाहनांनी आपापल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतील, त्यांना रोखण्याचं आव्हान आपल्यासमोर असेल. यावर उपाय शोधण्याची गरज आहे.”

आजच्या घडीला सर्व वैद्यकीय सुविधा राज्यात उपलब्ध आहेत. परंतु पुढील काळात क्वारंटाईनसाठी जादा सुविधा लागतील. औषधी, व्हेंटिलेटर्सची आणि उपचारांसाठी रुग्णालयांची गरज भासेल. यासाठी लष्करी रुग्णालयांची प्रसंगी मदत घ्यावी लागेल. याविषयी उपाययोजना करण्याची विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

संबंधित बातम्या:

Maharashtra corona death | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, बाधिताच्या संपर्कात 9 जण

Maharashtra Corona: महाराष्ट्राला किंचित दिलासा, 15 तासात एकही नवा रुग्ण नाही : राजेश टोपे

पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

Corona Updates: शिर्डीचे साईबाबा मंदिर आजपासून बंद

7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार

CM Uddhav Thackeray on Phase 3 Corona