Corona Updates LIVE: सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहणार

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर (Live Updates of News)

Corona Updates LIVE: सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहणार
Picture

सर्व सरकारी कार्यालये पुढील सात दिवस बंद राहणार

17/03/2020,5:07PM
Picture

मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या 22 गाड्या 17 ते 31 मार्चपर्यंत रद्द

17/03/2020,4:40PM
Picture

सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहणार - सूत्र

सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, अत्यावश्यक सेवा सुरु ठेवणार, सूत्रांची माहिती

17/03/2020,4:21PM
Picture

पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद

पुणे : पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद, 17 ते 19 तारखेपर्यंत हॉटेल आणि बार बंद, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशनचा निर्णय, बंदीची सक्ती नाही तर आवाहन

17/03/2020,3:47PM
Picture

कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची चिन्हं

कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची चिन्हं, निवडणुकीशी संबंधित सगळी कामे तात्काळ स्थगित करा, निवडणूक आयोगाचे महापालिका आयुक्तांना आदेश

17/03/2020,1:44PM
Picture

पंढरपूर | कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद

17/03/2020,12:18PM
Picture

शिर्डीचे साईबाबा मंदिर आजपासून बंद

17/03/2020,12:13PM
Picture

मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून 400 कैदी तळोजा कारागृहात हलवले

17/03/2020,12:10PM
Picture

औरंगाबादमध्ये कोरोना संशयित रुग्णालयातून पळाला

औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयातून एक संशयित कोरोना रुग्ण पळाला, तपासणीसाठी दाखल झाला असतानाचा प्रकार, जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील घटना, 14 दिवस निरीक्षणाखाली राहावं लागणार या भीतीने पळाल्याची माहिती

17/03/2020,10:33AM
Picture

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिर

17/03/2020,10:27AM
Picture

फुरसुंगी आणि उरुळी गावातील ग्रामस्थांचं कचरा डेपो विरोधातील आंदोलन स्थगित

17/03/2020,8:13AM
Picture

टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद

कल्याण : टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय, धार्मिक स्थळ काही दिवस बंद करण्याचं मुख्यमंत्र्यांकडूनही आवाहन

17/03/2020,8:09AM
Picture

नागपूरात एकाच दिवशी 20 कोरोना संशयित

नागपूरात एकाच दिवशी 20 कोरोना संशयित, मेडिकल रुग्णालयात 16, तर मेयोमध्ये 4 संशयितांची भर, सर्वांवर उपचार सुरु, दोन दिवसात नागपूरात एकही कोरोना पॉझिटीव्ह नाही, कोरोना लक्षणं आढळलेल्या डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह

17/03/2020,8:06AM
Picture

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये विशेष फवारणी मोहिम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रो स्टेशनवर विशेष फवारणी मोहिम, 4 पथकांचा या कामात समावेश, प्रवाशांना जागरुक करण्यासोबतच सुरक्षेसंबंधी बोर्ड, बॅनर आणि पोस्टरचाही वापर

17/03/2020,8:01AM
Picture

कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर पंढरपूरचा आठवडी बाजारही रद्द

कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर पंढरपूरचा आठवडी बाजारही रद्द, गर्दी टाळण्यासाठी नगरपालिकेचा निर्णय, CEO अनिकेत मानोरकर यांची माहिती

17/03/2020,8:00AM
Picture

कोरेनामुळे नागपूर विद्यापीठाच्या 222 परीक्षा पुढे ढकलल्या

17/03/2020,7:58AM
Picture

कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा

कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा, वाहनधारकांची तारांबळ, मध्यरात्री पंपावर पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड गर्दी, पंप चालक असोशिएशनकडून पंप बंद राहणार नसल्याची माहिती, जिल्हाधिकारी दौलत देसाईंकडूनही पंप सुरु राहणार असल्याचं स्पष्ट

17/03/2020,7:51AM
Picture

वसईत 20 वर्षांच्या विवाहित तरुणीची हत्या, कुटुंबियांकडून सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याचा गंभीर आरोप

वसईत 20 वर्षांच्या विवाहित तरुणीची हत्या, कुटुंबियांकडून सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याचा गंभीर आरोप, महिलेच्या पतीला अटक, वसई पूर्व सातीवली परिसरातील घटना, वालीव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

17/03/2020,7:36AM
Picture

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत परीक्षा पूढे ढकलण्याची मागणी

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत परीक्षा पूढे ढकलण्याची मागणी, विद्यार्थ्यांकडून अधिष्ठातांना निवेदन, अनेक विद्यार्थी परीक्षेला गैरहजर, अधिष्ठातांकडून निवेदन पुढील कारवाईसाठी कुलसचिवांकडे

17/03/2020,7:33AM
Picture

भिवंडी शहरातील चावींद्रा डम्पिंग ग्राऊंडला रात्रीच्या सुमारास आग

भिवंडी शहरातील चावींद्रा डम्पिंग ग्राऊंडला रात्रीच्या सुमारास आग, आगीमुळे परिसरात धुराने नागरीक त्रस्त, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

17/03/2020,7:32AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *