महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार – राजेश टोपे

| Updated on: Oct 20, 2021 | 12:51 PM

यापुढे 18 वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांचं लसीकरण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. तसंच पोस्ट व्हॅक्सिनेशन बाबतही काळजी घ्यायची आहे. या दृष्टीकोनातून जे किट आहेत ते आपल्याला उपलब्ध करुन द्यावे लागणार असल्याचं टोपे म्हणाले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार - राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई : राज्यातील अनेक महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहे. अशावेळी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे हे महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ‘मी काल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी महाविद्यालये सुरु करण्याबाबत बोललो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागतच आहे. मात्र, आता यापुढे 18 वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांचं लसीकरण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. तसंच पोस्ट व्हॅक्सिनेशन बाबतही काळजी घ्यायची आहे. या दृष्टीकोनातून जे किट आहेत ते आपल्याला उपलब्ध करुन द्यावे लागणार असल्याचं टोपे म्हणाले. (Special campaign will be launched for vaccination of college students, Information of Rajesh Tope)

हॉटेल आणि रेस्टॉरंट्सची वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमच्या विभागाची बैठक झाली. त्यातील जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार रात्री 12 वाजेपर्यंत रेस्टॉरंट्स आणि हॉटेलची वेळ वाढवण्यात आली आहे. तर सर्व दुकानांनी रात्री 11 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. हा निर्णय मुंबईबाबतचा असला तरी इतर ठिकाणी जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात वेळेबाबतचा निर्णय घेतील, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.

तिसऱ्या लाटेची भीती आहे का?

कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्याबाबत बोलताना टोपे म्हणाले की, ज्या प्रकारे आपण सर्वकाही सुरु केलं आहे. जगात सर्वत्र तिसरी लाट आलेली आहे. मात्र, ती लाट सौम्य होती आणि त्याची दाहकता तेवढी दिसली नाही. त्यामध्ये मृत्यूदरही कमी होता. मिशन कवचकुंडल अभियान आपण दसऱ्यापर्यंत ठेवलं होत, ते आता आपण दिवाळीपर्यंत वाढवल्याचंही टोपे यांनी सांगितलं. तसंच या अभियानाला नागरिकांनी प्रतिसाद देण्याचं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

मुंबई लोकलबाबतचा निर्णय दिवाळीनंतर होणार?

मुंबई लोकलचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री मुंबई लोकलबाबत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. लोकलबाबत प्रवाशांचे निर्बंध कसे असावेत याकडे त्यांचं लक्ष आहे. टास्क फोर्ससोबत बोलून ते याबाबतचा निर्णय घेत असतात. दिवाळीनंतर काही दिवसांनी जर पॉझिटिव्हिटी रेट वाढला नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली नाही. तर मुख्यमंत्री सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकतील, अशी शक्यताही टोपे यांनी व्यक्त केली आहे.

टप्प्या टप्प्यानं कॉलेज सुरु करावं – उदय सामंत

जरी महाविद्यालयांना नियोजन करण्यासाठी किंवा महाविद्यालये सुरू करण्यासाठी वेळ मिळाला नसला तरी त्यांनी टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करावे. आज आरोग्य विभाग संचालिका अर्चना पाटील यांच्यासोबत सुद्धा एक बैठक आहे. यामध्ये कॅम्पस मध्ये लसीकरण कशा प्रकारे करावे याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. जेणेकरून कॅम्पस मध्येच विद्यार्थ्यांना पहिला डोस दुसरा डोस देता येतील. ही मोठी मोहीम आम्ही पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहोत, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.

कॉलेज जर 20 तारखेला सुरू झाले नाहीत तर त्यांच्यावरही कारवाई वगैरे काही करणार नाही. ही जबाबदारी विद्यापीठांवर दिली आहे, विद्यापीठाने सदरची नियमावली अंतिम केली आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की जी नियमावली आखून दिली आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावे. 20 तारखेला आज कॉलेजेस सुरू होत नसतील तर त्यांनी 21, 22 तारखेला कॉलेज सुरू करावेत. मात्र, 25 तारखेच्या आत हे कॉलेज सुरू केले पाहिजेत. काही त्रुटी असतील तर शासन सुद्धा त्याना मदत करेल, असं उदय सामंत म्हणाले.

इतर बातम्या :

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही, आर्यन खानसाठी कोर्टात जाणारा नेता उद्धव ठाकरेंवर बरसला!

देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांतदादांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर

Special campaign will be launched for vaccination of college students, Information Rajesh Tope