AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही, आर्यन खानसाठी कोर्टात जाणारा नेता उद्धव ठाकरेंवर बरसला!

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांबद्दल बोलले असते तर बरं वाटलं असतं, अशी शेतकऱ्यांची भावना होती, असं किशोर तिवारी म्हणाले.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही, आर्यन खानसाठी कोर्टात जाणारा नेता उद्धव ठाकरेंवर बरसला!
cm uddhav thackeray
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 20, 2021 | 11:20 AM
Share

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणाची संबंध राज्यभर चर्चा झाली. या भाषणात भाजपवर तुटून पडताना येणाऱ्या काळातील शिवसेनेच्या राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली. शिवसैनिकांमध्ये नेहमीप्रमाणे उर्जा जागवली. मात्र या भाषणात शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री बोलले नाहीत, बोलले असते तर बरं वाटलं असतं, अशी खंत व्यक्त करत शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी घरचा आहेर दिलाय. हे तेच किशोर तिवारी आहेत, ज्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान निर्दोष असल्याचं म्हणत त्याच्या जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या तोंड शेतकऱ्यांबद्दल एक शब्द नाही

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांबद्दल बोलले असते तर बरं वाटलं असतं, अशी शेतकऱ्यांची भावना होती, असं किशोर तिवारी म्हणाले. पण त्याच वेळी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मी शेतकऱ्यांना सांगितलं, असंही सांगायला किशोर तिवारी विसरले नाहीत.

जिल्हाधिकारी माजले आहेत, सरकारची प्रशासनाला भिती नाही

पाठोपाठ येणाऱ्या आपत्तीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या नुकसानभरपाईबाबत बोलताना किशोर तिवारींची जीभ मात्र घसरली. मागच्या वर्षाचीही नुकसानभरपाई मिळाली नाही, यंदा तर पंचनामेच नाहीत. जिल्हाधिकारी माजले आहेत, असं किशोर तिवारी म्हणाले.

विदर्भात वाढत्या शेतकरी आत्महत्येला सरकार-प्रशासन जबाबदार

मंत्र्यांनी आपल्या कामाबाबत विचार करावा, मंत्र्यांना ग्रामीण जनता निवडणूक देते. विदर्भातील हजार शेतकरी आत्महत्यांची नैतिक जबाबदारी विदर्भातील मंत्र्यांनी घ्यावी. विदर्भात वर्षभरात हजारच्या वर शेतकरी आत्महत्या झाल्यात. विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढण्यास प्रशासन आणि सरकार जबाबदार, असंही किशोरी तिवारी म्हणाले.

सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज

शेतकऱ्यांना पतपुरवठा धोरण चुकीचं होतंय, नापिकीमुळेही शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मतंही किशोर तिवारी यांनी व्यक्त केलं.

योजना आखण्यात आणि अंमलबजावणी करण्यात राज्य-केंद्र अपयशी

कोरोना काळात अधिकारी गावात जात नाही. नोकरशाहीच्या उदासीनतेचा हा परिणाम आहे. योजना आखण्यात आणि अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार आणि केंद्राचंही अपयश आहे. लोकप्रतिनिधी आणि मंत्री याचा आढावा घेतात की नाही माहित नाही. पण जिल्हाधिकारी आणि प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, असंही किशोरी तिवारी म्हणाले.

आर्यन खानच्या जामीनासाठी किशोरी तिवारी मैदानात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळावा, यासाठी शाहरुखकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावर शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खान निर्दोष आहे म्हणत त्याच्या जामीनासाठी किशोर तिवारी मैदानात उतरले आहेत.

(Shivsena leader kishor Tiwari Slam Cm Uddhav thackeray over Dasara Melava Speech)

हे ही वाचा :

अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो, साताऱ्यातल्या सभेत शशिकांत शिंदे आक्रमक

भावना गवळींना चिकनगुनियाची लागण; ईडीच्या समोर हजर राहणार नाही

Follow Us
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?