AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांच्यावर ‘गद्दार’ असे गाणे, संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले ‘कुनाल की कमाल’, आता शिवसेना कॉमेडियनविरोधात आक्रमक

कोण हा कुणाल कामरा? जर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काही गाणे गायले असेल तर त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक होणार आहे. आमचे आमदार मुरजी पटेल हे कुणाल कामरा यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करतील.

एकनाथ शिंदे यांच्यावर 'गद्दार' असे गाणे, संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले 'कुनाल की कमाल', आता शिवसेना कॉमेडियनविरोधात आक्रमक
कुणाल कामरा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 24, 2025 | 5:23 PM
Share

कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले आहे. या गाण्याच्या बोलवरुन शिवसेना संतप्त झाली आहे. त्यांनी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी हे गाणे ट्विट केले आहे. सोबत ‘कुनाल की कमाल! जय महाराष्ट्र!’, असे लिहिले आहे. दरम्यान या गाण्यात कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार संबोधिले आहे. यापूर्वी कुणाल कामरा यांनी अनेक वाद निर्माण केले आहे.

काय आहे गाणे

महाराष्ट्राच्या राजकारणावर कुणाल कामरा बोलतात. शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. हा प्रकारात सर्वच कन्फूज झाले. हा प्रकार एकाने सुरु केला होता, असे सांगत गाण्याचे बोल सुरु होतात. ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से दोखो तो गद्दार नजर आये…. ‘ या गाण्यात त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नाही. परंतु आता शिवसेना आक्रमक झाली आहे.

शिवसेना आक्रमक, काळे फासण्याचा इशारा

शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले, कोण हा कुणाल कामरा? जर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काही गाणे गायले असेल तर त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक होणार आहे. आमचे आमदार मुरजी पटेल हे कुणाल कामरा यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करतील. त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसैनिक आक्रमक होतील. शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, कुणाल कामरा याने आज १२ वाजेपर्यंत माफीनामा मागितला नाही तर संपूर्ण शिवसेना महिला आघाडी कुणाल कामराच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, रात्री उशीरा कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना आमदार मुरजी पटेल एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले. कुणाल कामराने विनोदाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांनी तक्रार दिली. एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

कुणाल कामरा अन् वाद

कुणाल कामरा आणि वाद समीकरण आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी वाद घातला होता. त्यानंतर त्यांच्यावर प्रवास करण्यास विमान कंपनीने बंदी आणली होती. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाससोबतही कुणाल कामरा यांचा सोशल मीडियावर वाद झाला होता.

Follow Us
बाळासाहेबांच्या चाहत्यांची माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या चाहत्यांची माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे यांची मोठी घोषणा