व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो नकोच; काँग्रेसचा विरोध

| Updated on: Jun 10, 2021 | 4:30 PM

व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काँग्रसने आक्षेप घेतला आहे. व्हॅक्सिनेशन फोटोवर पंतप्रधानांचा फोटो नसावा. आमचा त्याला विरोध आहे, असं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.

व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो नकोच; काँग्रेसचा विरोध
भाई जगताप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष
Follow us on

मुंबई: व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काँग्रसने आक्षेप घेतला आहे. व्हॅक्सिनेशन फोटोवर पंतप्रधानांचा फोटो नसावा. आमचा त्याला विरोध आहे, असं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. (congress demands removal of PM Modi’s photo from COVID vaccination certificate)

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदींच्या फोटोला आक्षेप असल्याचं म्हटलं आहे. केरळ आणि छत्तीसगडमध्ये व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचा फोटो नसावा. आमचा या फोटोला आक्षेप आहे, असं भाई जगताप म्हणाले.

पोलिसांच्या कुटुंबाचं व्हॅक्सिनेशन करा

काँग्रेसविरोधात देशात खोट्या टूलकिटचा प्रचार केला गेला. पण आम्ही मुंबई पोलिसांना खरे टूल किट वाटप केले आहे. मुंबईच्या एकूण 94 पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबवण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं. पोलीस हे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत. 400 पोलीस कोविड काळात शहीद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांचंही तातडीने लसीकरण केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना याबाबतची विनंती केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजपचे लोक मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. भाजपशासित राज्यात काय परिस्थिती आहे. ते आधी चंद्रकांतदादांनी पाहावं. उत्तर प्रदेशात तर मृतदेहांची विटंबना होत आहे. मध्यप्रदेशात त्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. आम्ही वस्तुस्थिती सांगतो. भाजपचे लोक मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. मी चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महत्त्व देत नाही. कोविडसाठी चंद्रकांतदादांनी किती पैसे दिले? काय नाकवर करताय तुम्ही?, असा सवालही त्यांनी केला.

वाघाचा विश्वासघात कुणी केला?

इतकी वर्षे वाघाशी मैत्री होती. मग वाघाचा विश्वासघात कुणी केला? बीकेसीत पंतप्रधान आले होते. तेव्हा उद्धव ठाकरेंना खाली बाजूला बसवलं होतं. भाजप सत्तेसाठी उतावीळ आहे. पाच वर्षात त्यांनी राज्याचं वाटोळं केलं, असं सांगतानाच मविआ सरकारचं चांगलं चाललं आहे, असं ते म्हणाले.

पालिकेत स्वबळावर लढणार

मुंबई महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्ही सर्वच्या सर्व 227 जागांवर लढवणार आहोत. यापूर्वीही आम्ही वेगळेच लढलो होतो, असं सांगतानाच भाजपने आपल्या जागा टिकवून दाखवाव्यात असं माझं आव्हान आहे, असं ते म्हणाले. (congress demands removal of PM Modi’s photo from COVID vaccination certificate)

 

संबंधित बातम्या:

मुंबईत कोणी किंमत दिली नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, संभाजीराजेंचा एल्गार, मराठा मोर्चाची दिशा ठरली

ठाकरे-मोदी भेटीवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत

परळीच्या सिरसाळा येथे अखेर एमआयडीसी होणार, उद्योग विभागाची मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

(congress demands removal of PM Modi’s photo from COVID vaccination certificate)