AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोले यांच्याकडून आतली बातमी? ‘त्या’ बिल्डिंगमधून सगळे कंत्राट वाटप केले जातात?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजवपर निशाणा साधलाय. त्यांनी कंत्राट वाटपावरुन गंभीर आरोप केले आहेत. एका दलालाच्या माध्यमातून कंत्राट दिले जात असल्याचा दावा नाना पटोले यांनी केलाय. तसेच आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचं पटोले यांनी सांगितलंय.

नाना पटोले यांच्याकडून आतली बातमी? 'त्या' बिल्डिंगमधून सगळे कंत्राट वाटप केले जातात?
nana patoleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2023 | 5:59 PM
Share

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर आज सडकून टीका केलीय. विशेष म्हणजे त्यांनी कंत्राट वाटपावरुन भाजवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांपासून अनेक मुद्द्यांवर भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. “भाजप हिंदुत्वाचं कंत्राट घेतल्यासारखे काम करत आहे. भाजप श्रीरामांच्या नावावर पैसे गोळा करत आहे. ते स्वतःच्या मौजेसाठी पैसे वापरत आहेत. निर्यात शुल्क 40 टक्के लावल्याने कांदा विकता येत नाही. टोमॉटोला जास्त भाव आला हे ह्यांना पचले नाही, म्हणून नेपाळवरून त्यांनी टोमॅटो मागवले. शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळाले तर हे भाजपवाल्यांना पचत नाही”, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

“हे सरकार फक्त दलाल चालवत आहे. निर्मल बिल्डिंग आहे. तिथून सगळे कंत्राट वाटप केले जात आहेत. सरकारचा एक दलाल तिथे बसला आहे. राज्यातील जनतेचा पैसा तिथून लुटला जातोय. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. येत्या अधिवेशनात आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत. सरकारला आम्ही प्रश्न विचारणार आहोत. ‘शासन आपल्या दारी’ हा सरकारचा पैसे उधळण्याचा कार्यक्रम आहे. राज्यातील जी काही कंत्राट वाटले जातात त्या व्यक्तीकडून कसे वाटले जातात? याचे पुरावे आहेत. याचा आम्ही बुरखा लवकरच फाडणार”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

‘भाजप हा जनमत संपलेला पक्ष’

भाजपकडून सुमार कामगिरी असणाऱ्या खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या या रणनीतीवरही नाना पटोले यांनी टीका केलीय. “भाजप हा जनमत संपलेला पक्ष आहे. पराभवाच्या भीतीने भाजप असे करत आहे. हा जुमला देणारा पक्ष आहे, जिकंण्यासाठी असा असफल प्रयत्न करत आहेत”, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

नाना पटोलेंची खोचक टीका

“या सरकारमध्ये मंत्री संजय राठोड, मंत्री अब्दुल सत्तार, उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, त्यांच्यावर आरोप आहेत. ते सरकारमध्ये बसले आहेत. या सरकारवर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. सत्तार हे तर छोटे प्यादे आहेत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली. “हिंदुत्वाचे आम्हीच ठेकेदार असा दावा करणाऱ्या भाजपवाल्यांना भारत माता की जय म्हणायची लाज वाटत आहे. त्यांना फक्त मोदी की जय म्हणायचं आहे. ते त्यांच्या पोटातून आले आहेत”, अशी देखील टीका नाना पटोले यांनी केलीय.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.