AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर वर्गणी काढणार का? कोरोना हे युद्धच, सरकारने खात्यात पैसे टाकावेत : पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोना आणि लॉकडाऊनवर आक्रमक भूमिका घेतलीय

पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर वर्गणी काढणार का? कोरोना हे युद्धच, सरकारने खात्यात पैसे टाकावेत : पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण.
| Updated on: Mar 31, 2021 | 4:00 PM
Share

सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोना आणि लॉकडाऊनवर आक्रमक भूमिका घेतलीय. “देशातील कोरोनाची स्थिती पाहता हे युद्धच आहे. पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर वर्गणी काढतो का? कोरोना गल्लीबोळात आहे,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. तसेच अशा स्थितीत सरकार मदत करायला तयार नसेल तर काय करायचं? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला (Congress leader Prithviraj Chavan criticize Modi government over Corona Lockdown and economical help to people).

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “केंद्राने हाफकिनला कोरोना लस उत्पादनासाठी परवानगी द्यावी. भारत बायोटेकने साधन सामुग्री आणि लसीचं टेक्नीक पुरवावं. केंद्राने अजून परवानगी दिली नाही, ती तातडीने द्यावी. लॉकडाऊन झाल्यावर सर्वसामान्यांवर नुकसान सहन करण्याची वेळ येईल. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय, पण तो स्वीकारणे नुकसानीचं आहे. एप्रिल हा काळजी घेणारा महिना आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, गर्दी करु नये, मास्क वापरावं आणि प्रशासनाला मोठा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नये.”

‘लॉकडाऊन करु नये, केला तर परदेशाप्रमाणे थेट नागरिकांच्या बँक खात्यात पैसे टाकावे’

“पहिल्या टप्प्याने खूप नुकसान झालंय. दुसऱ्यानेही होईल. त्यामुळे याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. शासनाने काही उपाययोजना केल्या आहेत, तर काही केल्या नाहीत. लॉकडाऊन करु नये, जर केला तर परदेशाप्रमाणे थेट नागरिकांच्या बँक खात्यात पैसे टाकावे. लॉकडाऊन केलंच तर अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं. लॉकडाऊन कुणाला मजा येते म्हणून नाही, जीव वाचवण्यासाठी असतो. जीव की रोजगार हा प्रश्न असतो, पण जीव महत्त्वाचा असतो. लॉकडाऊन करायचा असेल, तर पूर्वसूचना द्यायला हवी,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

‘महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरु’

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. ते म्हणाले, “दुसरी लाट नक्की सुरु झालीय. नागपूर, अमरावतीत व्हायरस आलाय तो आफ्रिकेतील आहे की कुठला हे तज्ज्ञ तपासत आहेत.”

‘अमेरिकेत प्रत्येक बेरोजगाराला महिन्याला 1400 डॉलर, इंग्लंडमध्ये 2500 पौंड’

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “पाश्चिमात्य देशांमध्ये खासगी लोकांना पगार दिला जातोय. तसं केंद्र सरकारने तिजोरीतून खासगी लोकांच्या खात्यात पैसे द्यावे. अमेरिकेने 6 मार्चला कायदा करुन 21 लाख कोटी वाटले. तेथील नागरिकांना 12 डॉलर प्रतिमाह वेतन देण्यात आलंय. एका कुटुंबात 4 सदस्य असतील तर पती-पत्नीला 1200 आणि मुलांना 500 डॉलर देण्यात आलेत.”

“अमेरिकेत बेरोजगारांना प्रति महिना 1400 डॉलर, ब्रिटनमध्ये 2500 पौंड देण्यात आलेत. दुसरीकडे सिंगापूरमध्ये यासाठी 23 मिलियनची तरतूद करण्यात आली. थायलंडमध्ये 6 महिन्यांसाठी 50 टक्के पगार देण्यात येतोय,” असंही त्यांनी नमूद केलं.

‘कोरोना राजकीय विषय नाही, डॉक्टरांनी सांगितलं तर लॉकडाऊनही करावा लागेल’

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “भारतात 3 कोटी लोक दारिद्र्य रेषेत ढकलली आहेत. लाखो रोजगार कायमस्वरुपी गेलेत. केंद्राने मतदीचा हात द्यावा, थेट पैसे दिले, तर अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही. पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर वर्गणी काढतो का? हे आता सुरु आहे ते युद्धच आहे. कोरोना गल्लीबोळात आहे. सरकार तयार नसेल तर काय करायचं?”

“लॉकडाऊनला विरोध वगैरे असा काहीही नाही. हा वैद्यकीय विषय आहे, राजकीय नाही. डॉक्टरांनी सांगितलं तर लॉकडाऊनही करावा लागेल. मी आत्ता अर्थचक्राबद्दल बोलतोय. कोरोना हा वैद्यकीय विषय आहे आणि त्यावर काँग्रेसचं काय किंवा राष्ट्रवादीचं काय हा विषय नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, पृथ्वीराज चव्हाणांच्या ठाकरे सरकारकडे 5 मागण्या

Prithviraj Chavan 75th Birthday | खासदार आई-वडिलांचा ‘मुख्यमंत्री’ मुलगा, पृथ्वीराज चव्हाणांविषयी ‘या’ गोष्टी माहित आहेत?

अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर

व्हिडीओ पाहा :

Congress leader Prithviraj Chavan criticize Modi government over Corona Lockdown and economical help to people

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.