Corona | कोरोनामुळे रक्तदानात घट, ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा

| Updated on: Mar 20, 2020 | 4:03 PM

कोरोना संसर्गाचा फटका मुंबई, नवी मुंबईतील रक्तपेढ्यांंनाही बसला आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Corona | कोरोनामुळे रक्तदानात घट, ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा
Follow us on

नवी मुंबई : कोरोना संसर्गाचा फटका मुंबई, (Corona Effect Blood Donation) नवी मुंबईतील रक्तपेढ्यांंनाही बसला आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू झाल्याने रक्तदान शिबिर घेण्यावर (Corona Effect Blood Donation) बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाच्या धास्तीने रक्तदाते रक्तदान करत नसल्याचे रक्त पेढ्यांच्या प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे मागणी प्रमाणे रक्तपुरवठा करणे शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबई, पुणे ते नागपूर, 31 मार्चपर्यंत कुठे काय चालू राहणार?

मुंबईतील काही रुग्णालयांंमध्ये आपल्या स्वतःच्या रक्त पेढ्या आहेत. मात्र इतर रुग्णलयांमध्ये शहरातील इतर खासगी रक्तपेढ्यांमधून रक्ताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो. रक्तदान शिबिरं, तसेच वैयक्तिक रक्तदात्यांच्या माध्यमातून रक्तपेढ्यांमध्ये रक्त प्लेटलेट्स आणि प्लाजमा यांचं संकलन केलं जातं.

कोरोनामुळे रक्तदान शिबिरं घेण्यावर बंदी

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेण्यावर बंदी आल्याने दररोजच रक्त संकलन सध्या पूर्णतः बंद झाले आहे. शहरातील खासगी रक्तपेढ्यांमधून महिन्याला साधारणत: तीन ते चार रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात. त्यांच्या माध्यमातून साधारणत: 800 बॉटल रक्त संकलित केलं जातं. (Corona Effect Blood Donation) मात्र, सध्या जमावबंदी कायदा लागू असल्याने रक्तदान शिबिरे घेण्यावर बंदी आली असून त्यामुळे रक्ताचा संकलीत साठा संपला आहे.

रक्तपेढीत दररोज साधारणत: 30 ते 40 लोकांकडून विविध प्रकारच्या रक्ताची मागणी करण्यात येते. मात्र, रक्ताचा साठा संपला असल्याने रक्तपुरवठा करु शकत नसल्याचे नवी मुंबई ब्लड बँकेचे संचालक किशोर बडगुजर यांनी सांगितले.

कोरोनाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमजुती

“सरकारने सध्या जमावबंदी आदेश लागू केल्याने रक्तदान शिबिरं थांबवण्यात आली आहेत. रक्तदान शिबिरे घेण्यासाठी सध्या परवानगी दिली जात नाही. त्यामुळे गेल्या  महिन्याभरापासून रक्तदान शिबिर पूर्णतः  बंद ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय लोकांमध्ये कोरोना संसर्ग बाबत अनेक गैरसमजुती असल्याने अनेक वैयक्तिक रक्तदाते रक्तपेढ्यांमध्ये फिरकत नाहीत”, असं किशोर बडगुजर यांनी सांगितलं,

तसेच, “रक्तपेढ्यांमध्ये सध्या प्लाजमाचा काही प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मात्र, प्लेटलेटचा साठा पूर्णपणे संपलेला आहे. तर रक्तसाठा केवळ 15 ते 20 टक्के असून एप्रिल ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत तोही संपणार आहे. त्यामुळे मे महिन्यामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयात रक्ताची फार आवश्यकता आहे. हे रक्त उपलब्ध होणे गरजेचे आहे. रक्तदान शिबिरांवर सध्या बंदी असली, तरी रक्तदाते वैयक्तिकपणे रक्तदान करु शकतात. त्यामुळे कोणत्याही (Corona Effect Blood Donation) प्रकारची भीती न बाळगता रक्तदात्यांनी रक्तदान करावे”, असे आवाहनही किशोर बडगुजर यांनी केले.

संबंधित बातम्या :

कोरोना vs ठाकरे सरकार : दिवसभरातील महत्त्वाचे निर्णय

पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर

Corona | बीड जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल

Corona | सिंगापूरमध्ये अडकलेले 50 भारतीय विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मायदेशी