मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाला कोरोनाचा फटका; सेवा शुल्क थकल्याने महसूल घटला

Namrata Patil

| Edited By: |

Updated on: Jan 11, 2021 | 6:31 PM

परिणामी याचा फटका मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाला बसणार आहे. (Corona Effect On BMC Budget)  

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाला कोरोनाचा फटका; सेवा शुल्क थकल्याने महसूल घटला
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग

Follow us on

मुंबई : कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांप्रमाणे शासकीय कार्यालयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असणाऱ्या !महापालिकेलाही यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून महापालिकांचे सर्व आर्थिक स्त्रोत बंद होते. त्यामुळे सेवांची शुल्क वसूली थकली होती. याचा परिणाम मुंबई महापालिकेच्या महसूलावर झाला आहे. परिणामी याचा फटका मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाला बसणार आहे. (Corona Effect On BMC Budget)

मुंबई महापालिकेचा चालू अर्थसंकल्प हा 33 हजार 441 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये महसुली उत्पन्न हे 28 हजार 448 कोटी रुपयांचे आहे. त्याशिवाय जकातीच्या नुकसानीपोटी जीएसटीतून 9 हजार 799 कोटी रुपये, मालमत्ता कराच्या माध्यमातून 6,768 कोटी आणि विकास नियोजन शुल्क व अधिमूल्य यातून 3 हजार 879 कोटी रुपये अशाप्रकारे इतर महसूलाची रक्कम प्रशासनाने अंदाजित केली आहे.

पण मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सर्व आर्थिक व्यवहार थंड पडले आहेत. यामुळे त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर पडला आहे. याचा फटका मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाला बसणार असल्याचे बोललं जात आहे.

मुंबई महापालिकेला प्रत्येक महिन्यात जीएसटीची रक्कम प्राप्त होते. पण, मालमत्ता करातून आतापर्यंत 570 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.

महापालिकेच्या तिसरा मोठा स्त्रोत म्हणजे विकास नियोजन शुल्क व अधिमूल्य. यातून आयुक्तांनी 1 हजार 828 कोटी रुपयांचा महसूल प्रस्तावित होता. मात्र गेल्या 6 डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत केवळ 568 कोटी रुपये जमा झाले आहेत.

तर जाहिरातींच्या माध्यमातून महापालिकेला वार्षिक 150 ते 175 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. त्यामुळे महापालिकेने 221 कोटींचा महसूल अपेक्षित मानला असला तरी प्रत्यक्षात होर्डिंगची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.

तसेच मुंबईला पाणी आणि मलनि:सारण करातून आयुक्तांनी 1 हजार 535 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित मानला आहे. परंतु कोव्हिडमुळे अनेक जलदेयकांची वसुली होवू शकलेली नाही.(Corona Effect On BMC Budget)

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा थेट पुढच्या वर्षीच, पालिका आयुक्तांचे संकेत

मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर, मनपा आयुक्तांची नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI