मुंबई ‘जी दक्षिण’ अतिगंभीर कोरोना ‘हॉटस्पॉट’, मुख्यमंत्र्यांचं सरकारी आणि खाजगी निवासस्थानही गंभीर क्षेत्रात

| Updated on: Apr 06, 2020 | 3:58 PM

'जी दक्षिण' आणि 'ई' हे वॉर्ड अतिगंभीर स्वरुपाचे 'हॉटस्पॉट' आहेत. या दोन्ही प्रशासकीय विभागात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. (Corona Mumbai Ward wise Hot spot)

मुंबई जी दक्षिण अतिगंभीर कोरोना हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचं सरकारी आणि खाजगी निवासस्थानही गंभीर क्षेत्रात
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेने सर्वाधिक ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळलेले मुंबईतील विभाग ‘हॉटस्पॉट‘ म्हणून जाहीर केले आहेत. ‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकारी आणि खाजगी ही दोन्ही निवासस्थानं गंभीर स्थिती असलेल्या विभागांमध्ये मोडतात. (Corona Mumbai Ward wise Hot spot)

‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर स्वरुपाचे ‘हॉटस्पॉट’ आहेत. या दोन्ही प्रशासकीय विभागात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. ‘जी दक्षिण’मध्ये मुंबईतील सर्वाधिक म्हणजे 68, तर ‘ई’ वॉर्डमध्ये 44 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. 5 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हे ‘हॉटस्पॉट’ ठरवण्यात आले आहेत.

‘ई’ वॉर्डमध्ये भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर या भागांचा समावेश होतो. काल रुग्णांची वाढ झाल्यामुळे हा भाग पाचव्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर गेला.

‘के पूर्व’ आणि वांद्रे-कलानगर असलेला ‘एच पूर्व’ या विभागांमध्ये फक्त एका रुग्णाचा फरक आहे. एखादा रुग्ण वाढला, तर कलानगर असलेला विभाग टॉप 5 मध्ये जाईल. या विभागामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे खाजगी निवासस्थान येते.

मुंबईतील टॉप कोरोना हॉटस्पॉट (20 पेक्षा अधिक रुग्ण असलेले अतिगंभीर आणि गंभीर विभाग)

महापालिका विभाग – मनपा प्रशासकीय रचनेनुसार त्यात येणारे भाग

1. जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड
2. – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर
3. के पश्चिम – जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम
4. डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली
5. के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व
6. एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व
7. पी उत्तर – मालाड, मालवणी, मढ बेट
8. एम पश्चिम – चुनाभट्टी, टिळकनगर, चेंबुर, गोवंडी

कुठे किती रुग्ण? (Corona Ward wise Hot spot)

जी दक्षिण68

ई – 44

के पश्चिम – 37

डी – 34

के पूर्व – 26

एच पूर्व – 25

पी उत्तर – 24

एम पश्चिम – 21

उत्तर – 16

एम पूर्व – 16

एच पश्चिम – 16

दक्षिण – 12

आर दक्षिण – 12

टी – 11

पी दक्षिण – 10

जी उत्तर – 9

एल – 8

ए – 8

आर मध्य – 7 

एफ उत्तर – 7

मध्य – 7

आर उत्तर – 6

एफ दक्षिण – 5

बी – 4

(Corona Mumbai Ward wise Hot spot)

संबंधित बातम्या :

कोरोनाविरुद्धची लढाई प्रदीर्घ, पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत, जनतेने दाखवलेल्या गांभीर्य-एकजूटीचंही कौतुक

वॉकहार्ट रुग्णालयात 26 नर्स, 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण, रुग्णालय परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित

अंधेरीत एकाच कुटुंबातील 10 जणांना ‘कोरोना’, मुंबईतील दोन खासगी रुग्णालयात उपचार