Delta Plus Update : महाराष्ट्राला मोठा दिलासा, जळगावसह रत्नागिरीतील रुग्णांची डेल्टा प्लसवर मात

| Updated on: Jun 30, 2021 | 9:37 PM

महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमधून सावरत असतानाच राज्यावर कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंट संकट उभं राहिलं. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळून आले आहेत.

Delta Plus Update : महाराष्ट्राला मोठा दिलासा, जळगावसह रत्नागिरीतील रुग्णांची डेल्टा प्लसवर मात
Corona
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमधून सावरत असतानाच राज्यावर कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंट संकट उभं राहिलं. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे त्यापैकी अनेक रुग्ण हे बरे देखील झाले आहेत. रत्नागिरी, जळगाव, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाले आहेत. (Corona Virus Delta Plus Variant Jalgaon Ratnagiri Sindhudurg Thane Palghar patients cured )

जळगावातील सात रुग्ण बरे

जळगाव जिल्ह्यासह कोरोनाची दुसरी लाट मंदावत असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने धोक्याची घंटा वाजवली. संपूर्ण महाराष्ट्रात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी सात रुग्ण हे जळगाव जिल्ह्यात आढळून आले होते. हे सातही रुग्ण बरे झाले असून सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना डेल्टाच प्लस एकही बाधित रुग्ण नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून स्थिती पूर्वपदावर येत असतानाच दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरीयंटच्या अचानकच्या एन्ट्रीने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान जळगाव जिल्ह्यात आढळून आलेले कोरोना डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण बरे झाले आहेत.

रत्नागिरीतील 8 रुग्ण बरे, एका महिलेचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 9 रुग्ण सापडले होते. त्यातील एका 80 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. तर उर्वरित 8 उपचार घेऊन पूर्णतः बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या डेल्टा प्लसचा एकही अ‌ॅक्टिव्ह रुग्ण नाही. पैकी तीन रुग्ण हे लहान मुलं होती. ती देखील कोरोनातून बरे झाली आहेत.

पालघरमधील एक रुग्ण बरा

दोन महिन्यांपूर्वी पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात डेल्टा प्लस या विषाणूचा रुग्ण सापडला असल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. मात्र, हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून जिल्ह्यात आता एकही रुग्ण डेल्टा प्लस स्थान असल्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र केळकर यांनी सांगितले आहे.

ठाण्यातील रुग्ण बरा

ठाणे जिल्हयात डेल्टा प्लस चा सद्या एकही रुग्ण नाही. काही दिवसांपूर्वी एक जण आढळला होता तो मूळचा रायगड या ठिकाणचा होता. तो नवी मुंबई या ठिकाणी उपचार घेत होता. आता त्याला देखील डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असताना कोणालाही संसर्गा झाल्याचं आढळलं नाही.

सिंधुदुर्गमध्ये डेल्टाचा सद्या एकही सक्रिय रुग्ण नाही

सिंधुदुर्गात सद्यस्थितीत डेल्टा प्लसचा एकही बाधीत रूग्ण नसून काही दिवसांपूर्वी कणकवली परबवाडी येथे डेल्टा प्लस बाधीत रूग्ण सापडला होता. मात्र, तो रूग्ण बरा होऊन घरी परतला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांचे अहवाल तपासण्यात आले होते.मात्र कुणालाही डेल्टा प्लस आजाराची लागण झालेली नाही. त्यामुळे सध्या स्थितीत जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही बाधीत रूग्ण नसल्याची माहीती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई महानगरपालिकेची सरस कामगिरी; 35 दिवसांत उभारलं 2170 बेड्सचं अत्याधुनिक हॉस्पिटल

डेल्टा प्लस व्हॅरिएंटचा वाढता धोका, 60 रुग्णांचा आकडा पार, धाकधूक वाढली, पुण्यातल्या शास्त्रज्ञांची महत्त्वाची माहिती

(Corona Virus Delta Plus Variant Jalgaon Ratnagiri Sindhudurg Thane Palghar patients cured )