डेल्टा प्लस व्हॅरिएंटचा वाढता धोका, धाकधूक वाढली, पुण्यातल्या शास्त्रज्ञांची महत्त्वाची माहिती

आतापर्यंत देशातील 12 राज्यात आढळणारा डेल्टा प्लस वेगाने पसरत आहे (Corona New varient Delta plus 60 Cases In India 14 New in Maharashtra)

डेल्टा प्लस व्हॅरिएंटचा वाढता धोका, धाकधूक वाढली, पुण्यातल्या शास्त्रज्ञांची महत्त्वाची माहिती
फोटो : पीटीआय, प्रातिनिधिक फोटो

मुंबई : आतापर्यंत देशातील 12 राज्यात आढळणारा डेल्टा प्लस (Delta plus) वेगाने पसरत आहे. राज्यात डेल्टा प्लसच्या नवीन रुग्णांनी आकडा हळूहळू वाढू लागला आहे. गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात 14 नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्याचबरोबर दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही या व्हॅरिएंटचे रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Corona New varient Delta plus 60 Cases In India 14 New in Maharashtra)

12 राज्यांत डेल्टा प्लसचे रुग्ण, चार राज्यांत सापडण्याची शक्यता

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत डेल्टा प्लसचे रुग्ण मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये मिळाले आहेत. तर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही हा नवा व्हॅरिएंट असण्याची शक्यता व्यक्त केली जातीय. या आठवड्यात या चार राज्यात डेल्टा प्लस आहे की नाही, हे कळू शकेल.

कोरोना विषाणूचे गॅमा व्हॅरियंट भारतातून हद्दपार

दरम्यान, कोरोना विषाणूचे गॅमा व्हॅरियंट भारतातून हद्दपार झाला आहे. आता देशात गॅमा व्हेरिएंटचे कोणतीही केस शिल्लक नाही, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. मागील पाच महिन्यांपासून हा प्रकार जिनोम सिक्वेसिंगमध्ये दिसत नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्ये जीनोम सिक्वेंसींग सुरू झाले होते. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा रूपे भारतात आली. त्या काळात डेल्टा केसेस नव्हत्या, परंतु फेब्रुवारीपासून केवळ अल्फा, बीटा आणि डेल्टा केसेस दिसू लागली आहेत.

मार्च आणि एप्रिलमध्ये डेल्टा व्यतिरिक्त डेल्टा प्लस आणि एवाय 2.० याशिवाय इटा, लोटा आणि कापा व्हॅरिएंट देशात मिळत होता. सद्यस्थितीत दुसरी लाट ओसरल्यानंतर केसेस कमी होऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, जीनोम सिक्वेंसींगबद्दल बोलायचं झाल्यास, डेल्टाच्या 86 टक्के केसेस आढळून येत आहेत. या व्यतिरिक्त अल्फा आणि बीटा प्रकार देखील व्हॅरिएंट आहेत. देशात आता गॅमा व्हॅरिएंटचे केसस नाहीत.

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध

डेल्टा प्लसचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले होते. परंतु आता डेल्टा प्लसने शासन आणि प्रशासनाची धाकधूक वाढवली आहे.

(Corona New varient Delta plus 60 Cases In India 14 New in Maharashtra)

हे ही वाचा :

Maharashtra Coronavirus LIVE Update : देशात 24 तासांत 37 हजार 566 नवे रुग्ण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI