भाटिया रुग्णालयातील 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, वॉकहार्ट, शुश्रुषा, जसलोकनंतर भाटिया रुग्णालयही सील

| Updated on: Apr 13, 2020 | 2:41 PM

मुंबईतील ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयात काल 14 जणांचे (Bhatia Hospital worker Corona positive) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

भाटिया रुग्णालयातील 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, वॉकहार्ट, शुश्रुषा, जसलोकनंतर भाटिया रुग्णालयही सील
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत (Bhatia Hospital worker Corona positive) आहे. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (13 एप्रिल) भाटिया रुग्णालयात काम करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईतील ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयात काल 14 जणांचे (Bhatia Hospital worker Corona positive) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आता आणखी 11 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता भाटिया रुग्णालयातील एकूण 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर दुसरीकडे मुंबईतील नायगाव परिसरातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

आतापर्यंत मुंबईतील भाटिया, वॉकहार्ट, सुश्रूषा, जसलोक या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्णालय सील करण्यात आली आहेत.

दरम्यान मुंबईत उच्चभ्रू सोसायट्यांसह झोपडपट्टीमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यानतंर आता तर डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पोलिसांसह इतर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा 2 हजार पार

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Maharashtra Corona Virus Update) आहे. यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 हजार 357 वर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईला कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आज मुंबईत 59 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 हजार 298 वरुन 1 हजार 357 वर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2064 वर पोहचली (Bhatia Hospital worker Corona positive) आहे.