AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kurla Bus Accident : पोलिसांची मागणी फेटाळत कोर्टाने आरोपीला प्रत्यक्ष सुनावणीला बोलावलं, जोरदार युक्तिवादानंतर मोठा निर्णय

कुर्ला बस अपघात प्रकरणी कोर्टाने आरोपी संजय मोरे याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली होती, तर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली.

Kurla Bus Accident : पोलिसांची मागणी फेटाळत कोर्टाने आरोपीला प्रत्यक्ष सुनावणीला बोलावलं, जोरदार युक्तिवादानंतर मोठा निर्णय
कुर्ला बस अपघात
| Updated on: Dec 10, 2024 | 4:41 PM
Share

कुर्ला बस अपधघात प्रकरणातील आरोपी ड्रायव्हर संजय मोरे याला कोर्टाने 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीची काय गरज आहे? असा प्रश्न उपस्थित करत युक्तिवाद केला होता. पण पोलिसांनी या प्रकरणात आरोपीचं किंवा इतर कुणाचं काही षडयंत्र होतं का? याबाबत तपास करायचा असल्याने आरोपीची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. दोन्ही बाजूने यावेळी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यानंतर अखेर कोर्टाने याबाबतचा निकाल जाहीर केला. विशेष म्हणजे कोर्टाने आरोपीला प्रत्यक्ष कोर्टात हजर करावे, असे आदेश दिल्यानंतर त्याला कोर्टात आणण्यात आलं होतं.

कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेला व्हिसीद्वारे हजर करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला कोर्टात न आणता व्हिसीद्वारे कोर्टात हजर करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कोर्टाकडे तसा लेखी अर्ज दिला होता. कोर्टाने संबंधित अर्ज मान्य केल्यास आरोपीला व्हिसीद्वारे हजर करण्यात येणार होते. पण कोर्टाने तो अर्ज फेटाळला. न्यायाधीशांनी आरोपीला प्रत्यक्षात कोर्टात हजर करण्याच्या सूचना दिल्या. आरोपीला कोर्टात आणून हजर करण्याच्या सूचनेनंतर पोलिसांनी आरोपी संजय मोरे याला कोर्टात आणलं. यानंतर या प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली.

कोर्टात काय-काय युक्तिवात झाला?

कोर्टाने मारहाणीची तक्रार आहे का? असे म्हणताच आरोपी संजय मोरे याने नाही असे म्हटले. यानंतर पोलिसांनी तपासाची माहिती दिली. आरोपी संजय मोरे याने बेस्ट बस चालवताना 300 मीटर परिसरात 50 ते 60 गाड्यांना धडक दिली. ड्रायव्हरला पूर्ण कल्पना होती की हा रहदारीचा परिसर आहे. गाडीतही पॅसेजर होते. ड्रायव्हरने ही गाडी बेदरकारने चालवली. त्यामागे हेतू काय होता? हा कट आहे का? यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करायचा आहे. तो अमली पदार्थच्या सेवनाखाली होता का? याचीही चौकशी करायची आहे. त्यामुळे आरोपीची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद पोलिसांनी कोर्टात केला.

यानंतर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आरोपीची कोठडी कशासाठी हवी आहे? असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला. “बेस्ट प्रशासनाला योग्य तो पत्रव्यवहार करून त्यांना हवी असलेली माहिती घेऊ शकतात. आरोपीचे प्रशिक्षण झाले आहे की नाही हे बेस्ट प्रशासन सांगू शकतं. आरोपीची अटक झाल्यावर मेडिकल करण्यात आलं होतं. जर त्याने नशा केली असेल तर ते समोर आले नसेल का?”, असा सवाल आरोपीच्या वकिलांमी केला. आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला.

यावेळी पोलिसांनी कोर्टात एक महत्त्वाचा प्रश्न मांडला. या बसचा आरोपीने हत्यार म्हणून वापर केला आहे का? हा एक कट आहे का? याचा तपास करायचा आहे, असे पोलीस कोर्टात म्हणाले. तर दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, “पोलीस कोठडीसाठी पोलिसांकडे कोणतेही व्हॅलिड कारण नाही.” दोन्ही बाजू्ंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.