कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम, 4 कोटी नागरिकांचे लसीकरण

| Updated on: Jul 20, 2021 | 6:37 PM

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा (डोस) चार कोटींचा टप्पा पार केला आहे.

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम, 4 कोटी नागरिकांचे लसीकरण
Corona Vaccination
Follow us on

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा (डोस) चार कोटींचा टप्पा पार केला आहे. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले. (Covid-19 – more than 4 crore citizens Vaccinated in Maharashtra)

देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या चार कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटी सहा लाख 99 हजार 339 तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 93 लाख 25 हजार 362 इतकी आहे. आज दुपारपर्यंत राज्यात एक लाख 20 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

12 ते 18 वर्षे वयाच्या मुलांच्या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) 12 ते 18 वर्षे वयोगटासाठीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात ही लस लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे लहान मुलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुढील महिन्यात लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होणार

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाची लस येत्या ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या कंपनीने गेल्या 1 जुलैला याबाबतची माहिती दिली होती. झायडस कॅडिलानं 12 ते 18 वर्षे वयोगटातील डीएनएवर आधारित असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लस ZyCoV-D ची निर्मिती केली आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायल नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पुढील 45 ते 60 दिवसात ZyCoV-D लस उपलब्ध होईल. ही लस भारतीय औषध महानियंत्रकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झायडस कॅडिलानं 12 ते 18 वर्षे वयोगटातील लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या लसीला लवकरच परवानगी दिली जाणार आहे. त्यानुसार 12 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात होईल.

अल्पवयीन मुलाकडून कोर्टात याचिका

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. यानंतर आता सरकारकडून कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही तयारी केली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ही अतिधोकादायक असून त्यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी लवकरात लवकर कोरोना लसीकरण सुरु करा अशी मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने 12 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस कधी मिळणार असा सवाल करत थेट याचिका दाखल केली होती. या याचिकेला केंद्र सरकारने एका शपथपत्राच्या सहाय्याने उत्तर दिले आहे.

इतर बातम्या

Mumbai Vaccination | मुंबई BKC केंद्रावर गेल्या आठवड्यापासून लसीकरणासाठी लांबच लांब रांग

Aurangabad | औरंगाबादेत लसीकरण पुन्हा केंद्रावर गोंधळ, लसतुटवड्यामुळे नागरिकांची तुफान गर्दी

(Covid-19 – more than 4 crore citizens Vaccinated in Maharashtra)