या कोविडयोद्ध्यांना सलाम; नऊ वर्षांच्या मुलीला एकटं घरी ठेवून डॉक्टर आई-बाबा कामावर

कामावर जाताना टाकळगावर दाम्पत्याला त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीला घरी एकटेच सोडून जावे लागते. | Covid warriors

या कोविडयोद्ध्यांना सलाम; नऊ वर्षांच्या मुलीला एकटं घरी ठेवून डॉक्टर आई-बाबा कामावर

भाईंदर: आतापर्यंत आपण कोविड योद्ध्यांच्या (Coronavirus) अनेक कहाण्या ऐकल्या असतील. त्यांची कामावरील निष्ठा, तळमळ आणि जीव धोक्यात घालून काम करण्याचे धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे. मीरा-भाईंदरमध्येही सध्या एक डॉक्टर दाम्पत्य असेच काम करत आहे. मात्र, या कामात या दोघांना त्यांच्या लहान मुलीची साथ मिळत आहे. (Doctor parents keep their 9 year old girl at home due to coronavirus situation)

डॉ. गौतम टाकळगावकर त्यांची पत्नी डॉ. उज्वला गौतम टाकळगावकर गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. कामावर जाताना टाकळगावर दाम्पत्याला त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीला घरी एकटेच सोडून जावे लागते. मात्र, नऊ वर्षांची वाण्या ही वर्षभरापासून मोठ्या धीराने ही परिस्थिती सांभाळत आहे.

गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाची प्रचंड भीती होती तेव्हा कोणीही कोविड रुग्णालयात काम करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी टाकळगावकर पती पत्नीने मीरा भाईंदर पालिकेच्या कोविड रुग्णालयात काम करण्यास तयार झाले. आपल्या नऊ वर्षाची मुलगी वण्याला कोणा जवळ ठेवायचं असा त्यांचा समोर प्रश्न तयार झाला. शेवटी त्यांच्यावर मुलीला एकटं घरी सोडून कामावर जाण्याची वेळ आली. आई वडील कोरोना रुग्णालयात कामावर आहे म्हणून शेजारी व सोसायटीच्या लोकांनी आपल्या मुलांना तिच्यासोबत खेळायला पाठवायला नकार दिला. या गोष्टीचे एक आई म्हणून दु:ख झाल्याचे उज्वला टाकळगावकर यांनी सांगितले.

अन् वाण्याने घरी एकटं राहण्याची तयारी दाखवली

डॉ. टाकळगावकर पती पत्नी कोरोनाशी लढा देत आहे. यामध्ये त्यांची मुलगी वाण्याचे सहकार्य त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. कारण ती न घाबरता एकटी घरात राहण्यासाठी तयार झाली. आई बाबा घरी नसताना वाण्या एकटीच घरी खेळत असे. चित्रकला आणि कॉम्प्युटर अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तिने स्वत:ला गुंतवून घेतले. एवढंच नव्हे तर ती स्वत:चा चहाही बनवायला शिकली.

संबंधित बातम्या:

Inspirational Story | कोरोनाच्या औषधांचा साईड इफेक्ट झाल्याने दुर्धर आजाराने ग्रासले, वॉकर घेऊन कोरोनाबाधितांवर उपचार, कोरोना योद्ध्याची कहाणी

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?

Mumbai Drive in vaccination centers list | मुंबईत प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण होणार, तुमच्या जवळचे केंद्र बघा

(Doctor parents keep their 9 year old girl at home due to coronavirus situation)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI