Inspirational Story | कोरोनाच्या औषधांचा साईड इफेक्ट झाल्याने दुर्धर आजाराने ग्रासले, वॉकर घेऊन कोरोनाबाधितांवर उपचार, कोरोना योद्ध्याची कहाणी

Namrata Patil

|

Updated on: Apr 30, 2021 | 8:03 AM

पण तरी ते आपल्या जीवाची पर्वा न करता वॉकरच्या सहाय्याने प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णांना उपचार देत आहेत. (Covid Yoddha Dr Ashok Gite Inspirational Story)

Inspirational Story | कोरोनाच्या औषधांचा साईड इफेक्ट झाल्याने दुर्धर आजाराने ग्रासले, वॉकर घेऊन कोरोनाबाधितांवर उपचार, कोरोना योद्ध्याची कहाणी
Dr. Ashok Gite
Follow us

मीरा-भाईंदर : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी आरोग्य यंत्रणा सपशेल फेल ठरत आहेत. पण कोरोनाचा लढा देणारे डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांवर उपचार करत आहे. अशाच प्रकारे कोव्हिड योद्धा म्हणून काम करणारे पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील डॉ. अशोक गीते…त्यांना कोरोनासोबतच हिपॅजवाईनवर ए. बी. एन नावाचा आजार झाला. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. पण तरी ते आपल्या जीवाची पर्वा न करता वॉकरच्या सहाय्याने प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णांना उपचार देत आहेत. (Pandit Bhimsen Joshi Hospital Dr Ashok Gite Covid Yoddha Inspirational Story)

जीवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात 

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालय आहे. कोरोना आजार आल्यापासून हे रुग्णालय कोरोनाबाधितांसाठी काम करत आहे. अनेक डॉक्टर, नर्सेस आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्सस तसेच इतर कर्मचारी कोरोनाशी दोन हात करत आहेत. त्यातीलच एक डॉ. अशोक गीते..

डॉ. अशोक गीते हे पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहे. जे आपली जबाबदारी इमानदाराने पार पाडत आहेत. आपल्या जबाबदारी पार पडत असताना डॉ. अशोक गीते यांना गेल्यावर्षी कोरोनाची लागण झाली. कोरोना उपचाराच्या दरम्यान डॉ. अशोक गीते यांना औषधांचे साईड इफेक्ट झाले. ज्यामुळे त्यांच्या हिपज्वाईंडमध्ये एवैस्कुलर नेकरोसिस ( ए.वी.एन.) नावाचा आजार झाला.

शस्त्रक्रियेनंतर विश्रांती न घेता थेट रुग्णालयात रुजू

मार्च 2021 मध्ये डॉ. अशोक गीते यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेमुळे त्यांना चालण्याची समस्या जाणवू लागली. त्यामुळे त्यांना चालण्यासाठी वॉकरचा वापर करावा लागत आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण त्यांनी विश्रांती न करता ते थेट रुग्णालयात रुजू झाले.

यानंतर वॉकरच्या सहाय्याने प्रत्येक वॉर्डात जाऊन ते कोरोना रुग्णांवर उपचार घेत आहेत. तसेच सीसीटीव्हीच्या मदतीने रुग्णालयाच्या सर्व कामकाजावर नजर ही ठेवत आहेत. त्यामुळे त्यांच्या सहकारी डॉक्टरांचे मनोबल वाढत आहे.  (Pandit Bhimsen Joshi Hospital Dr Ashok Gite Covid Yoddha Inspirational Story)

संबंधित बातम्या : 

COVID-19 : कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतरही अशक्तपणा जाणवतोय? जाणून घ्या काय करावे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश होरपळतोय; नितीन गडकरी म्हणतात, तिसरी आणि चौथी लाटही येणार

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI