Deepak Kesarkar : शरद पवारांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेबांना यातना का दिल्या? दीपक केसरकरांचे सवाल

| Updated on: Jul 13, 2022 | 6:25 PM

पवारांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तरही आता त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीत असतानाचा एक किस्सा केसरकरांनी सांगितला.

Deepak Kesarkar : शरद पवारांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेबांना यातना का दिल्या? दीपक केसरकरांचे सवाल
दीपक केसरकर/शरद पवार
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या फुटीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जबाबदार आहेत, असा आरोप शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला आहे. ज्या ज्या वेळी शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार यांचा हात होता, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनीच मदत केली, असा गंभीर आरोपदेखील केसरकरांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. एवढेच नाही, तर शिवसेना सोडताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाठीशीदेखील शरद पवार यांचे आशीर्वाद होते, असेही केसरकर यांनी म्हटले आहे. एका वृत्तवहिनीच्या मुलाखतीत त्यांनी हे गंभीर आरोप शरद पवार यांच्यावर केले आहेत. मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

राष्ट्रवादीत असतानाचे सांगितले किस्से

पवारांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तरही आता त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीत असतानाचा एक किस्सा केसरकरांनी सांगितला. शरद पवार यांनी विश्वासात घेत राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती, असे सांगितले होते. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावे हे त्यांना सांगितले नाही, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे केसरकरांनी म्हटले. तर छगन भुजबळ यांना बाहेर काढत आपल्यासोबत घेतले. राज ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या निर्णयालाही शरद पवारांचा पाठिंबा होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘नेते मातोश्रीवर येत’

बाळासाहेब ठाकरे असताना सर्व नेते मातोश्रीवर येत असत. मात्र शरद पवारांची इच्छा होती, की मातोश्रीने सिल्व्हर ओकवर यावे, मात्र शिवसैनिकांनी असे कधीच होऊ दिले नाही. तसेच हे सर्व बाळासाहेबांना कधीही मान्य झाले नसते. त्यांना मान्य नसणारी भूमिका शिवसेना घेणार नाही, असे केसरकर म्हणाले. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नेहमी मातोश्रीवर येतो, मातोश्रीतील कुणी दिल्लीत जात नाही अशी महती आहे आणि कायम राहावी असेही केसरकर यावेळी म्हणाले.