AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Mumbai Police Commissioner : देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

New Mumbai Police Commissioner : विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत.

New Mumbai Police Commissioner : देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
Deven BhartiImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2025 | 1:47 PM
Share

देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपद देण्यात आलं आहे. विवेक फळसाळकर हे आज 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यांच्यानंतर आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. याशिवाय देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. विवेक फणसाळकर यांनी 30 जून 2022 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

ते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षण करणारे महत्त्वाचे कार्यालय असलेल्या संयुक्त पोलीस आयुक्तांपैकी एक होते. याशिवाय त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख यांसारखी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरात नोंदवलेल्या अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात देवेन भारती सहभागी होते.

देवेन भारती हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2014 ते 2019 दरम्यान देवेन भारती यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं. परंतु ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये (MSSC) बदली केली.

देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, मिड डे वृत्तपत्राचे पत्रकार जे. डे यांची हत्या या प्रकरणांचा तपास त्यांनी केला. राज्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचं जाळं नष्ट करण्यासाठीही ते ओळखले जातात.

महाविकास आघाडीच्या भाजप नेते हैदर आझम यांच्या पत्नीविरुद्ध एफआयआर नोंदवला नाही, असा आरोप करून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पोलीस तपासात याप्रकरणी कोणतेही पुरावे सापडले नाहीत. यात मुंबई गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचं नाव नव्हतं.

देवेन भारती यांचे दाऊद इब्राहिमशी संबंधित गुन्हेगारांशी संबंध असल्याचा आरोप गुन्हेगार विजय पलांडेनं केला होता. या आरोपांबाबत माजी राज्य पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी देवेन भारती यांच्याविरुद्ध चौकशी अहवाल दाखल केला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा चौकशी अहवाल फेटाळून लावला होता.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.