AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडीच्या नेत्यांपाठी ईडीचा ससेमिरा लावण्यामागे फडणवीसांचे कारस्थान, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे. इतकच काय आगामी काळात केंद्रातील सरकारही आम्ही ताब्यात घेऊ असा दावा करतानाच ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे.

आघाडीच्या नेत्यांपाठी ईडीचा ससेमिरा लावण्यामागे फडणवीसांचे कारस्थान, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
नवाब मलिक
| Updated on: Feb 09, 2022 | 6:40 PM
Share

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे. इतकच काय आगामी काळात केंद्रातील सरकारही आम्ही ताब्यात घेऊ असा दावा करतानाच ईडीचा (ED) ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे. प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावायची याचं मार्गदर्शन ते ईडी अधिकार्‍यांना करत आहेत, असं गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना ईडीचा ओएसडी करून टाका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या कारवायांवरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्रं लिहिलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना राऊत यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर मलिक यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. आमच्या नेत्यांच्यामागेही लावत आहेत. भाजपला वाटतंय घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील हा भाजपचा गैरसमज आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

जनता आमच्यासोबत राहील

ईडीच्या माध्यमातून भीती निर्माण करुन सत्ता काबीज करता येणार नाही. हे महाराष्ट्र आहे. शरद पवारांना नोटीस दिल्यानंतर तुमची काय परिस्थिती झाली होती हे राज्याने पाहिले होते. त्यामुळे तुम्ही जितका केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकारला दाबण्याचा प्रयत्न करणार तितक्या ताकदीने महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ता अमर नसते

संजय राऊत यांनी लिहिलेली परिस्थिती सत्य आहे. या सगळ्या कारवायांना कुणीही घाबरणार नाही. ईडीचा अधिकारी राजेश्वर सिंग राजीनामा देतो आणि त्याला उत्तरप्रदेशमधून भाजप तिकिट देते याचा अर्थ ईडीचे अधिकारी भाजप कार्यकर्ते आहेत. सत्तेचा वापर करून हे करत आहात. परंतु सत्ता गेल्यानंतर विरोधक जर असं वागले तर तुमची काय परिस्थिती होईल हे भाजपला आणि अधिकार्‍यांना कळलं पाहिजे. सत्ता काय अमर नसते. सत्ता परिवर्तन झाल्यावर त्याचे उत्तर अधिकार्‍यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकार्‍यांनी कायद्याने काम करावे, भाजप कार्यकर्ता म्हणून काम करु नये, असा इशाराही त्यांनी दिला.

हे जास्त दिवस चालणार नाही

महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्ष टिकणार आहे. अधिकार्‍यांचा वापर करून बातम्या पेरायच्या. लोकांना बदनाम करायचे. नोटीसा पाठवायच्या हा सगळा उद्योग केंद्रीय यंत्रणांनी बंद करावा. हे जास्त दिवस चालणार नाही, असं सांगतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून मलाही धमक्या दिल्या जात आहेत. मी काही भित्रा नाही. भाजपला कितीही काही करु द्या. मी शेवटपर्यंत लढणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मोदी माफी मागा अन्यथा भाजप नेत्यांच्या घरासमोर ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणून आंदोलन करु- नाना पटोले

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्य सरकारची अनोखी श्रद्धांजली, लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारलं जाणार

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...