Devendra Fadnavis : मुंबईला केंद्रशासित करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, फडणवीसांना पेडणेकरांचा इशारा, तुम्हाला कोणत्या फळाची उपमा? मिटकरींचा सवाल

यांचे संस्कार नाहीत तर दिसणार कसे? आम्ही कामाच्या रुपाने लोकांच्या समोर जाऊ, यांची संपूर्ण भाषणं हिंदीमध्ये झाली. यांना महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे. यांनी मुंबईची इज्जत काढली जाते, असा आरोप यावेळी पेडणेकरांनी केला आहे.

Devendra Fadnavis : मुंबईला केंद्रशासित करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, फडणवीसांना पेडणेकरांचा इशारा, तुम्हाला कोणत्या फळाची उपमा? मिटकरींचा सवाल
मुंबईला केंद्रशासित करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, फडणवीसांना पेडणेकरांचा इशाराImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 10:15 PM

मुंबई : शनिवारी बीकेसीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Cm Uddhav Thackeray)सभा पार पडली. त्यानंतर आज मुंबईत फडणवीसांचीही (Devendra Fadnavis)  सभा पार पडली. या दोन्ही सभेत मुंबई महापालिकेच्या (BMC Election) तोंडावर जोरदार वार पलटवार झाले. फडणवीसांच्या सभेनंतर त्यांच्या टीकेला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईला केद्रशासित करणे, हे तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. ही लुभावणारी सभा आहे, आमच्या हृदयात राम, हाताला काम आणि पोटाला भाकरी हेच आम्हाला कळतं, असे पेडणेकर यावेळी म्हणाल्या. तसेच यांचे संस्कार नाहीत तर दिसणार कसे? आम्ही कामाच्या रुपाने लोकांच्या समोर जाऊ, यांची संपूर्ण भाषणं हिंदीमध्ये झाली. यांना महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे. यांनी मुंबईची इज्जत काढली जाते, असा आरोप यावेळी पेडणेकरांनी केला आहे.

महागाईवर बोलत नाहीत

तसेच काल जनतेने पाहिलं. महागाईचा भडका उडाला आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांच्या भषणात कुठेही शिट्या वाजत नव्हृत्या. त्यांचा लाफ्टर शो नव्हता. आम्ही हिंदी भाषेत बोललो तर आम्हांला ट्रोल केल जातं आज सर्वजण हिंदी भाषेत बोलले. आपल्याला काय हवं तेच बोलले, पण जनतेला काय देणार त्यावर बोलणार नाहीत. सिलेंडवर बोलत नाहीय. सी ग्रेडच्या लोकांना बोलायला उभ करत आहेत. त्यामुळे श्री कृष्णाला कळत कोणाच्या बाजूने उभ राहयला पाहिजे आणि ते उद्धवजींच्या बाजुने उभा राहीले. त्यांचं नाव होतय हीच खरी पोटदुखी आहे. बोलण सोप्प असत करणं कठीण असतं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अमोल मिटकरीही आक्रमक

या भाषणावर अमोल मिटकरी यांनीही सडकडून टीका केली आहे. आता एक सभा ऐकली. या सभेला नाव कर्कश भोंगा असे जनता म्हणत आहे. हनुमान चालीसेचा चुकीचा अर्थ सांगितला आहे. एक प्रकारे हनुमान चालिसा अपमान केला आहे. पवार साहेबांच्या बाबतीत बोलताना. बाळासाहेब ठाकरेंच त्यांनी उदाहरण दिलं आहे. बाळासाहेब आणि पवार साहेब हे समवयस्क होते. एकमेकांवर टिका करण्याची एक वेगळी पद्धत होती. मात्र स्तर त्यांनी घालवला नाही. मात्र  तुमच्या बाबत महाराष्ट्राची जनता काय म्हणते? कुठल्या फळाचा समानार्थी शब्द दिला आहे ते बघा, असा टोला मिटकरींनी फडणवीसांना लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

तुमच्या तंबुचे कळस आधीच कापले

तसेच कर्कश आवाजात आम्ही हिंदु हे सांगितलं. ज्या प्रमाणे औरंगजेबाच्या तंबुचे कळस कापून आगोदरच संताजी आणि धनाजी घेउन गेले होते. त्याच प्रमाणे कालची मुख्यमंत्र्यांची सभा होती. भाजपच्या तंबुचे कळस कालच कापले गेले. म्हणून मोगलांच समर्थन कराणाऱ्या भाजपने महाविकास आघाडीच्या प्रवाहात उगाच नाक खुपसून हसू करू घेऊ नये असा घणाघात मिटकरी यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.