AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ‘सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर…’ फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना करारा जवाब

माझा सकाळचा शपथविधी केला, तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. पण सकाळची शपथ यशस्वी झाली असती तरी माझ्या मंत्रिमंडळात वाझे नसता, दाऊदचा साथीदार नसता. वर्क फ्रॉम जेल चाललं आहे, त्यांचे फोटो छापले जात आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. 

Devendra Fadnavis : 'सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर...' फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना करारा जवाब
'सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर...' फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना करारा जवाबImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 15, 2022 | 9:15 PM
Share

मुंबई : शुक्रवारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या सभेला आव्हान देत आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत सभा घेतली. या भेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या मुद्द्यांवरून टीका केली होती. त्या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. आता राजकारणाला एवढी फोडणी पडली असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) अडची वर्षा पूर्वीच्या पाहटेच्या शपथविधीचा मुद्दा कसा मागे राहिल. काल मुख्यमंत्र्यांनी त्यावरून टीका केली त्यानंतर आज फडणवीसांनी त्याच शपथविधीवरून पलटवार केलाय.  माझा सकाळचा शपथविधी केला, तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. पण सकाळची शपथ यशस्वी झाली असती तरी माझ्या मंत्रिमंडळात वाझे नसता, दाऊदचा साथीदार नसता. वर्क फ्रॉम जेल चाललं आहे, त्यांचे फोटो छापले जात आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

संसार आमच्याशी करून सपत्ती घेऊन पळाले

तर पाच वर्षे तुम्ही आमच्यासोबत संसार केला. आमची संपत्ती घेऊन पळून गेलात आणि दुसऱ्यासोबत लग्न केलं. ऑफिशियल काडीमोड तरी घ्यायचा आणि म्हणे एकतर्फी प्रेम. अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.  कालचं भाषण सोनियाजींना समर्पित होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेसची भूमिका म्हणजेत कालचं भाषण होतं. माझा प्रश्न आहे की उद्धवजींना हे माहिती तरी आहे का डॉ. हेडगेवार यांचं नाव देशातील स्वातंत्र्यसेनानीमध्ये आहे. ज्यावेळी आणीबाणी लादली आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकलं तेव्हा तुम्ही कुणाच्या बाजून होता. यांच्याकडे मुद्दा नसला की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र… कुणाच्या बापाची ताकद आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायची? असा सवालही त्यांनी केला आहे.

सामनावरूनही खोचक सवाल

तसेच उद्धवजी सांगत होते सामनामध्ये सत्य छापलं जातं. मग तुम्ही 2014 मध्ये सामनातून सोनिया आणि पवारांबाबत सांगत होता ते सत्य होतं का? तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जे आश्वासन दिलं होतं ते खरं होतं का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. तर मुंबई वेगळी करायची आहे आम्हाला पण तुमच्या भ्रष्टाचारापासून, अनाचारापासून, दूराचारापासून, अन्यायापासून वेगळी करायची आहे. रस्ते, नाली, भूयार काहीच सोडलं नाही. हे भाषण शिवसैनिकासाठी होतं तसं ते सोनियांजींसाठी होती. काल म्हणाले संभाजीनगर मी म्हणतो म्हणजे झालं ना… ओ खैरे व्हा आता बहिरे… औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोवर संभाजीनगर विसरा. कारण कालच उद्धवजी म्हणाले मॅडम आमचा पाठिंबा काढू नका. आम्ही संभाजीनगर करत नाही आम्ही औरंगाबादच ठेवतो, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?