मोठी बातमी! महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार? देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं विधान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचं मत मांडलंय.

मोठी बातमी! महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार? देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं विधान
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 01, 2022 | 12:00 AM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचं मत मांडलंय. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करु, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी मांडलंय. त्यामुळे समान नागरी कायद्याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय.

“संविधानाने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळेच कायदा लागू करतील असं मला वाटतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंड लागू करत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करतील. शिवाय त्यांना करावाच लागेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्रही योग्यवेळी हा कायदा लागू करण्याबाबत विचार करेल. संविधानाने याबाबत आपल्यावर जबाबतदारी टाकलीय की आपण राज्यात समान नागरी कायदा आणावा”, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.