धारावीत एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, 13 जण कोरोनाबाधित

| Updated on: Apr 09, 2020 | 7:01 PM

नुकतंच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला (Dharavi Corona patient died) आहे.

धारावीत एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, 13 जण कोरोनाबाधित
Follow us on

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Dharavi Corona patient died) आहे. मुंबईत धारावी, वरळी लोअर परेल, भायखाळा, अंधेरी पश्चिम या ठिकाणी दाटीवाटीच्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. नुकतंच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

धारावी मध्ये राहणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Dharavi Corona patient died) आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली. धारावीत आतापर्यंत 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांसोबतच मृतांच्या आकडेही झपाट्याने वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत 857 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 143 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली.

त्यापाठोपाठ पुणे 3, पिंपरी चिंचवड 2, यवतमाळ 1, अहमदनगर 3, ठाणे 1, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 4, मिरा-भाईंदर 1, वसई विरार 1, सिंधुदुर्ग 1 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 हजार 297 वर पोहोचला आहे.

मुंबईत जी साऊथ म्हणजे लोअर परेल आणि वरळीच्या परिसरात 184 रुग्ण आढळले आहेत. तर ई वॉर्ड म्हणजे भायखळा आणि आजूबाजूच्या परिसरात 64 रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ के वेस्ट अंधेरी पश्चिम परिसरात 46 रुग्ण आढळले. हे तिन्ही परिसर हे कोरोनाचे हॉटस्पॉट (Dharavi Corona patient died) ठरले आहेत.