AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावी पुनर्विकास : या भागातल्या वरील मजल्याच्या झोपडीधारकांना प्रारूप पात्रता यादीत स्थान

इतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये सामान्यतः अपात्र ठरणाऱ्या वरच्या मजल्यावरील घरांचा या प्रकल्पात समावेश केल्यामुळे, राज्य सरकार आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वसमावेशक धोरणाची दिशा स्पष्ट झाली आहे.

धारावी पुनर्विकास : या भागातल्या वरील मजल्याच्या झोपडीधारकांना प्रारूप पात्रता यादीत स्थान
| Updated on: Jun 24, 2025 | 7:39 PM
Share

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या ( डीआरपी ) अधिकृत वेबसाईटवर परिशिष्ट-II चा पहिला प्रारूप प्रकाशित करण्यात आला आहे. या यादीत धारावी अधिसूचित क्षेत्रातील (डीएनए) सेक्टर 6 मधील मेघवाडी आणि गणेश नगर या भागांचा समावेश करण्यात आला आहे. येथील एकूण 505 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी 229 घरे विविध गृहनिर्माण लाभांसाठी पात्र ठरवण्यात आली आहेत. त्यामध्ये पुढीलप्रमाणे लाभार्थ्यांचा समावेश आहे:

· 101 घरांना धारावीमध्येच विनामूल्य पुनर्वसनासाठी पात्र.

· 56 घरे, ज्यांमध्ये मालमत्ता हस्तांतरित झाल्या आहेत, त्या ₹40000 हस्तांतरण शुल्क भरल्यानंतर पात्र.

· 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या कालावधीत बांधलेल्या 13 तळमजल्यावरील घरांना धारावीबाहेरील अनुदानित गृहनिर्माणासाठी ₹2.5 लाख शुल्क भरल्यानंतर पात्र (सशुल्क पात्रता).

· 59 घरे परवडणाऱ्या भाडे गृहनिर्माण धोरणांतर्गत पात्र – यामध्ये 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत बांधलेल्या वरच्या मजल्यावरील घरे तसेच 1 जानेवारी 2011 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बांधलेल्या तलमजल्यावरील घरांचा समावेश आहे. सामान्यत: इतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये अपात्र ठरणाऱ्या वरच्या मजल्यावरील घरांचा या प्रकल्पात समावेश केल्यामुळे, राज्य सरकार आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वसमावेशक धोरणाची दिशा स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, 238 घरे आणि 38 सुविधा संरचना अद्याप पुनरावलोकनाखाली आहेत. या सुविधा संरचनांमध्ये सार्वजनिक शौचालये, मीटर रूम्स, महापालिकेच्या स्टोअररूम्स इत्यादींचा समावेश आहे.

सूचना आणि हरकती पाठवण्याचे आवाहन

प्रारूप परिशिष्ट-II सोबत प्रकाशित केलेल्या सूचनेनुसार, झोपडीधारकांनी आपल्या सूचना आणि हरकती 5 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत प्रत्यक्षपणे डीआरपी अधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात किंवा ई-मेलद्वारे dcca1drpsra@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यात.

संपर्क तपशील: डीआरपी / एसआरए सक्षम प्राधिकरण, दुसरा मजला, गाला अल्टीझा, शणमुखानंद हॉलशेजारी, किंग्ज सर्कल, सायन, मुंबई -400022

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.