AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या काँग्रेस-भाजप संघर्षात राष्ट्रवादीची एन्ट्री, दिलीप वळसे यांनी डिवचले राष्ट्रवादीला

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीवरुन ही ट्विट केले गेले आहे.

नाशिकच्या काँग्रेस-भाजप संघर्षात राष्ट्रवादीची एन्ट्री, दिलीप वळसे यांनी डिवचले राष्ट्रवादीला
दिलीप वळसे पाटील
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 13, 2023 | 12:44 PM
Share

मुंबई : पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत (vidhan Sabha election)भाजपने उमेदवार दिला नाही. यामुळे भाजपचे हे ऑपरेशन कमळ आहे का?  असा सवाल दिलीप वळसे यांनी विचारला. सुधीर तांबे (sudhir tambe) यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता या मागे भाजप आहे का? ही चर्चा सुरु झाली आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचे पहायला मिळाले. दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांनी काय म्हटले होते :

नाशिकमध्ये महिन्याभरापुर्वी एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सत्यजित तांबे यांच्यांवर आपली नजर असल्याचे म्हटले होते. कारण नाशिकमध्ये भाजपने आपला उमेदवार अजून दिला नाही. अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. भाजपने इतर चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. फक्त अपवाद नाशिकचा आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असतानाही सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे फडणवीस यांनी जे सांगितले, ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे की काय? ही चर्चा आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच