Ranjeet Kasale : नेत्यांची पोलखोल करणं भोवले; बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला अटक

Ranjeet Kasale Arrested : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड पोलीस सातत्याने चर्चेत आहे. त्यात बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्या वक्तव्याने तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

Ranjeet Kasale : नेत्यांची पोलखोल करणं भोवले; बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला अटक
रणजीत कासलेला पोलीस कोठडी
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 01, 2025 | 12:33 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्यातील पोलिसांचे एक एक कारनामे समोर आले. त्यात बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्या वक्तव्यांनी तर पोलीस खात्याची लक्तरं वेशीवर टांगली. त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले. बीड कारागृहात असताना त्यांनी वाल्मीक कराड याला चिकण, मटण आणि सर्व सोयीसुविधा देण्यात येत असल्याचा दावा केला होता. कासले जामीनावर बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून अनेक गौप्यस्फोट केले. सोशल मीडियावर नेत्यांची ‘ पोलखोल ‘ करणं बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला भोवलं. रणजीत कासलेला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली.

कासलेला दोन दिवसांची कोठडी

लोकप्रतिनिधींची बदनामी करण तसेच जातींमध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी रणजीत कासलेला अटक करण्यात आली. रणजीत कासलेला दिल्ली येथे अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोशल मीडियावर सातत्याने लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेला लक्ष केल्यामुळे सध्या चर्चेत रणजीत कासले सध्या चर्चेत आला आहे.

कासले हा निलंबित आणि बडतर्फ होण्यापूर्वी बीड पोलीस दलाच्या सायबर गुन्हे शाखेत पोलीस उप अधिक्षक होता. वाल्मीक कराड याचा एनकाऊंटर करण्यासाठी आपल्याला प्रस्ताव देण्यात आल्याचा दावा करून त्याने त्यावेळी खळबळ उडवली होती. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो सतत काही ना काही खळबजनक दावे करत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता. आता त्याने पुन्हा एकदा बड्या नेत्यांविरोधात दावे केले होते.

सीबीआय चौकशीची मागणी

याप्रकरणात करुणा शर्मा- मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात पोलीस उपनिरीक्षक रणजीत काळसे यांनी खुलासे केलेल्या नेत्यांवर CBI तथा केंद्रीय तपास यंत्रणामार्फत सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी जे आरोप केले आहेत, त्याचा सखोल तपास करण्याची विनंती मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.