ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर

Devendra Fadnavis on Drug Mafia: ड्रग्स माफियांविरोधात राज्य सरकारने धडक मोहीम राबवली आहे. नशामुक्त मुंबई आणि महाराष्ट्र करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. तर याप्रकरणात जे पोलीस दोषी आहेत, त्यांना बडतर्फ केल्याची माहिती आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ड्रग्स माफियांचे पाय लटलटले... सलीम डोळा ताब्यात... इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त... फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
देवेंद्र फडणवीस, नशामुक्त मुंबई
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 23, 2026 | 1:38 PM

Devendra Fadnavis on Drug Mafia: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आज विविध मुद्यांनी गाजला. आज ड्रग्स माफियांविरोधात विचारलेल्या विविध प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नशामुक्त मुंबई आणि महाराष्ट्र करण्यासाठी सरकार तत्पर असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह ही माहिती मांडली. विरोधकांनी आक्षेप नोंदवले. पोलिसांबाबत गंभीर आरोप केले. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.

राज्यात चार महिन्यांत २५४ कोटींचे ड्रग्ज जप्त

राज्यात चार महिन्यांत २५४ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी राज्यात १,१४२ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १,६२६ आरोपींना अटक करण्यात आली असून २५४.५३ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली. अंमली पदार्थ सेवनाविरोधात ३,१९९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबईसह राज्यभरात ड्रग्जविरोधी कारवाईसाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) ची सातही युनिट्स कार्यरत आहेत. सन २०२५ मध्ये ANTF आणि पोलिसांनी मिळून ५२३.१७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले. ड्रग्ज तस्करी व विक्रीबाबत शासनाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण असून दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान

पोलीस मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी करत आहेत. अश्या पोलिसांवर थेट कारवाई करावी. आमच्याकडे ऑनलाईन ड्रग्ज दिले जात आहेत, असा आरोप शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला. तर ड्रग्जच रॆकेट पोलिसांच्या संगतमताने होत असल्याचा आरोप नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. ड्रग्स बाबत आपण नेहमी या सभागृहात चर्चा करतो. ज्या ज्या ठिकाणी ड्रग्स विकला जातो त्याची माहिती पोलिसांना दिली तरी कारवाई होत नाही. आज गल्लीबोळात ड्रग्स विक्री केली जातेय, असा आरोप सुनील प्रभू यांनी केला. राज्यातील हा गंभीर गुन्हा झाला आहे. नार्कोटेस्ट विभाग काय करत आहे. राज्याबाहेर बंदरावर ड्रग्ज सापडतात तिकडे आपले पोलीस पाठवा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

अभियान तसेच नशामुक्ती जनजागृतीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली. अशा प्रकरणात जेवढे पोलीस दोषी आढळले त्यांना बडतर्फ केलं आहे. नार्कोटेस्ट विभाग आपण विस्तारित केला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण विभाग उभारतोय. चांगले अधिकारी अँटी फोर्स मध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. रोज मी आता नार्कोटेस्ट बाबत ब्रिफिंक घेईन, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ड्रग्ज बाबतचा मोहरक्या सलीम डोळाला अटक करण्यात आलीय. साताऱ्यात एक फैक्ट्री सापडली ही सुद्धा त्याची होती अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

विविध राज्यात जाऊन मुंबई पोलिसांनी ड्रग्स उध्वस्त केले आहे असे मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. मुंबईत ३ हजार शाळा कॉलेजमध्ये आपण कार्यक्रम हाती घेतलाय. आपण ड्रग्स फ्री बाबत मोहीम हाती घेत आहोतय ड्रग्स बाबत जे माहिती देतील त्यांच्यासाठी आपण बक्षीस देणार आहोत हे देताना त्या व्यक्तीची ओळख कळणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Follow Us