ट्रॅक दुरुस्ती मशीनच रुळावरुन घसरलं, लोकल विस्कळीत

ट्रॅक दुरुस्ती मशीनच रुळावरुन घसरलं, लोकल विस्कळीत

पालघर: ट्रॅक दुरुस्ती मशीनच रुळावरुन घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी सकाळीच विस्कळीत झाली. पालघरजवळ ट्रॅक मशीन रुळावरुन घसरलं. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल 15-20 मिनिटे उशिरा धावत आहेत, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना एक ते दीड तासाचा विलंब झाला आहे.

पालघर-केळवे रोड रेल्वे स्थानकदरम्यान अप लाईनवर रेल्वे ट्रॅक दुरुस्ती करणारे टॅम्पिंग मशीन (Tamping Machine-TTM) रुळावरुन घसरलं. रात्री सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे रेल्वेसेवा पूर्ण विस्कळीत झाली होती.

पश्चिम रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक मध्यरात्रीनंतर सुमारे तीन-चार तास ठप्प होती. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या किमान दीड-दोन तास विलंबाने धावत होत्या. विरार डहाणू रोड दरम्यान उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती.

सध्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, लांब पाल्याच्या गाड्या 1 ते अर्धा तास उशिराने धावत आहेत.