Mumbai Traffic Police : ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीसाठी कुठले रस्ते बंद? मुंबईच्या कुठल्या मार्गात बदल केलेत ते वाचा

Mumbai Traffic Police : मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने अधिसूचना काढली आहे. मुंबईत ईद-ए-मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पूर्व उपनगरात वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत.

Mumbai  Traffic Police :  ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीसाठी कुठले रस्ते बंद? मुंबईच्या कुठल्या मार्गात बदल केलेत ते वाचा
Traffic
| Updated on: Sep 04, 2025 | 1:17 PM

येत्या 8 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत ईद-ए-मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पूर्व उपनगरात वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, मानखुर्द आणि घाटकोपर भागात मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. शेकडो गाड्या टू व्हीलर्स आणि ट्रक या मिरवणुकी असतील असा अंदाज आहे.

8 सप्टेंबर रोजी मोठ्या मिरवणूकांमुळे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होण्याची शक्यता असल्याच अधिसूचनेत म्हटलं आहे.

पार्किंगला कुठे बंदी?

– अवजड वाहनांसाठी (ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीतील वाहन आणि बेस्ट बसेस वगळून) छेडा नगर जंक्शन ते मानखुर्द टी जंक्शन मार्ग बंद असेल.

– हलक्या वाहनांसाठी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडचा उड्डाण पुल वापरणं बंधनकारक असेल.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर (छेडा नगर जंक्शन ते मानखुर्द टी जंक्शन) वर वाहनांच्या पार्किंगला बंदी आहे.

वाहतुकीत काय बदल?

– छेडा नगरहून वाशिला जाणाऱ्या वाहनांनी ईस्टन एक्सप्रेस हायवेचा उमरशी बाप्पा जंक्शन आणि व्ही.एन.पुरव मार्गाचा वापर करावा.

– मानखुर्द टी जंक्शन ते घाटकोपर किंवा विक्रोळीवरुन येणाऱ्या वाहनांनी उमरशी बाप्पा जंक्शन आणि व्ही.एन.पुरव मार्गाचा वापर करावा.

मिरवणूक कुठून निघणार?

घाटकोपर पश्चिम चिराग नगर लेन जामा मशीद येथून दुपारी 1 वाजता ईद-ए-मिलादची स्वतंत्र मिरवणूक निघेल. विक्रोळी पार्कसाइट येथे ही मिरवणूक संपेल. 25 हजार लोक आणि 100 वाहन या मिरवणुकीत असतील असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

बाधित हेणारे मार्ग

– एलबीएस मार्ग (चिराग नगर, घाटकोपर ते गुलाटी पेट्रोप पम्प, विक्रोळी)

– प्रीमियर जंक्शन ते गांधी नगर जंक्शन (पवई) : अवजड वाहनांना परवानगी नसेल. यात खासगी बसेस, एसटी बसेस, बेस्ट बसेसना परवानगी नसेल.

या वाहतूक मार्गात बदल

पवई गांधी नगर जंक्शनवरुन दक्षिण मुंबईत जाणारी वाहनं जेव्हीएलआर, विक्रोळी मार्गे वळवण्यात आली आहेत.
श्रेयस जंक्शन आणि सावित्री बाई फुले जंक्शन जवळील वाहनं ईस्टन एक्सप्रेस हाय वे आणि पंतनगरला वळवण्यात आली आहेत.

काय आवाहन केलय?

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना कुर्ला आणि विक्रोळी दरम्यानच्या एलबीएस मार्गावरुन प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी वाहन चालकांना मुंबई वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याच आवाहन करण्यात आलं आहे.