MLC Election 2022: एवढ्यावेळी मला मदत करावीच लागेल, खडसेंचे भाजप आमदारांना फोन; हितेंद्र ठाकूरांशीही तासभर बंददाराआड चर्चा

राहुल झोरी

राहुल झोरी | Edited By: भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jun 19, 2022 | 5:49 PM

MLC Election 2022: भाजपने ताज प्रेसिडेंटमध्ये त्यांच्या आमदारांना ठेवलं आहे. खडसे यांनी आज भाजपच्या चार ते पाच आमदारांना फोन केला. एवढ्या वेळी मला तुम्हाला मतदान करावंच लागेल, अशी गळच खडसे यांनी या आमदारांना घातली आहे.

MLC Election 2022: एवढ्यावेळी मला मदत करावीच लागेल, खडसेंचे भाजप आमदारांना फोन; हितेंद्र ठाकूरांशीही तासभर बंददाराआड चर्चा
खडसेंचे भाजप आमदारांना फोन; हितेंद्र ठाकूरांशीही तासभर बंददाराआड चर्चा
Image Credit source: tv9 marathi

विजय गायकवाड, मुंबई: विधान परिषद निवडणुकीला (MLC Election 2022) अवघे काही तास बाकी असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार एकनाथ खडसे (eknath khadse) हे सक्रिय झाले आहेत. खडसे यांनी आज मतदानासाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. बंददाराआड झालेल्या या चर्चेचा तपशील उघड झाला नाही. मात्र, खडसे यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. तर, खडसे यांनी आज भाजपच्या काही आमदारांना फोन केल्याचं वृत्त आहे. एवढ्यावेळी तुम्हाला मला मदत करावीच लागेल, असं खडसे या आमदारांना फोनवर बोलल्याचं सांगितलं जात आहे. खडसे यांनी भाजपमध्ये असताना अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली होती. त्यामुळे त्यांनी आता या आमदारांकडे मते मागितली आहेत. विशेष म्हणजे यावेळी गुप्त मतदान आहे. त्यामुळे हे आमदार खडसेंच्या विनंतीला मान देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपने ताज प्रेसिडेंटमध्ये त्यांच्या आमदारांना ठेवलं आहे. खडसे यांनी आज भाजपच्या चार ते पाच आमदारांना फोन केला. एवढ्या वेळी मला तुम्हाला मतदान करावंच लागेल, अशी गळच खडसे यांनी या आमदारांना घातली आहे. खडसेंचा आमदारांना फोन आल्याची चर्चा ताज प्रेसिडेंटमधील भाजप आमदारांमध्ये रंगली आहे. त्यामुळे खडसेंना हे आमदार मतदान करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपमध्ये अनेक समर्थक

भाजपमधील दोन समर्थक आमदारांची खडसे यांना मते मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबाबत विचारलं असता भाजपमध्ये दोन नव्हे तर आपले अनेक समर्थक आहेत. काही माझ्या संपर्कात आहेत. पण पक्ष सोडून ते मला मतदान करतील असं काही दिसत नाही. मी पडलो पाहिजे असं नाही. तर भाजप आमचा प्रमुख विरोधक आहे. त्यामुळे भाजपला पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

ठाकूर योग्य तो निर्णय घेतील

एकनाथ खडसे यांनी आज हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. विरारच्या विवा महाविद्यालयात या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. मी उमेदवार आहे. बविआकडे तीन मते आहेत. त्यामुळे मी मते मागायला आलो आहे. त्यांच्याकडे तीन मते आहेत. ठाकूर योग्य तो निर्णय घेतील. मी शब्द घेण्यासाठी आलो नाही. तर मते मागण्यासाठी आलो आहे. उमेदवार म्हणून मत मागणं आपलं काम आहे. ते योग्य तो निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आमचा संबंध जुना

या भेटीत आमची कौटुंबिक चर्चाही झाली. आमचा 32 वर्षांपासूनचा संबंध आहे. राजकारण विरहित आमची ओळख आहे, असं खडसे म्हणाले. तर ठाकूर यांनी मीडियाशी संवाद साधण्यास नकार दिला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI