Eknath Khadse Kirit Somaiya Video : फडणवीसांचा फोटो खडसेंना दाखवला अन् ते लगेच गायलाही लागले, दुश्मन ना करे…

दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया है, अशी गाण्यातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते आणि पूर्वीचे सहकारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे.

Eknath Khadse Kirit Somaiya Video : फडणवीसांचा फोटो खडसेंना दाखवला अन् ते लगेच गायलाही लागले, दुश्मन ना करे...
किचन कल्लाकारमध्ये सहभागी एकनाथ खडसे
Image Credit source: Zee Marathi
प्रदीप गरड

|

Apr 14, 2022 | 2:35 PM

मुंबई : दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया है, अशी गाण्यातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते आणि पूर्वीचे सहकारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. झी मराठीच्या किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात त्यांनी हे टोले लगावले आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते किरीट सोमैया यांना बोलावण्यात आले होते. यावेळी किचनमध्ये मजेशीर कल्ला झालेला पाहायला मिळाला. राजकीय कोट्या, टोले यामुळे कार्यक्रमात रंगत आली. किरीट सोमैयांनीदेखील यावेळी टोले लगावत कार्यक्रमात रंगत आणली. दीड वर्षानंतर आपण आणि सोमैया एकाच व्यासपीठावर आलो असल्याचे खडसे यावेळी म्हणाले.

गाण्यातून फडणवीसांना टोले

झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात विविध क्षेत्रातली मंडळी येत असतात. नुकतेच या मंचावर एकनाथ खडसे, किरीट सोमैया आले होते. इथे काही राजकीय मंडळींचे फोटो दाखवण्यात आले तेव्हा त्यावर खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवल्यानंतर त्यांनी, दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया, हे गाणे म्हटले.

fadnavis

एकनाथ खडसे यांना दाखवण्यात आला देवेंद्र फडणवीस यांचा फोटो

‘सल्ला देण्याचा माझा अधिकार’

खडसे म्हणाले, की मी किरीट सोमैया यांना नेहमीच सल्ला देतो. सल्ला देण्याचा माझा अधिकार आहे, असे ते यावेळी म्हणाले. सोमैयांसोबतची मैत्री 30 वर्षांपासूनची आहे, असेही ते म्हणाले. पाहा, राजकारणी आणि टोलेबाजीचा व्हिडिओ –

आणखी वाचा :

Eknath Khadse : मी मित्रत्वाचे नाते जपले, त्यांनी मात्र कुभांडच रचले; खडसेंची फडणवीसांवर टीका

Saamana Editorial : भ्रष्टाचाराविरूध्द कोणी बोलायचे ? सामनातून भाजपशासीत राज्यातील भ्रष्टाचारावर भाष्य

Prakash Ambedkar : सुजात आंबेडकरची राजकारणात एन्ट्री? वडील प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें