BREAKING : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिंदे-फडणवीस एकत्र, उद्या महत्त्वाच्या घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या शिवाजी पार्क परिसरात जाणार आहेत.

BREAKING : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिंदे-फडणवीस एकत्र, उद्या महत्त्वाच्या घडामोडी
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Nov 15, 2022 | 9:49 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटावर बाप चोरल्याची टीका केलीय जातेय. याशिवाय दिल्ली हायकोर्टात उद्धव ठाकरे यांनी आपण आपल्या वडिलांनी पक्षाला दिलेलं नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याबाबत दिलेला निर्णय चुकीचा आहे, असा दावा केला होता. उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टीका केल्या जात आहेत. शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न वापरता राजकारण करावं, असं चॅलेंजही ठाकरेंकडून देण्यात आलंय. या सगळ्या घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या कामाची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या शिवाजी पार्क परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क परिसरातील स्मारकाच्या कामांची पाहाणी करणार आहेत.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या संकल्पनेचे सादरीकरण केलं होतं. त्यानंतर शिंदे-फडणवीस स्वत: शिवाजी पार्कमध्ये जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामांची पाहणी करणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबरला 10 वा स्मृतिदिन आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाचीही पाहाणी करणार आहेत.