शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला कर्नाटक सरकारच जबाबदार; एकनाथ शिंदेंचा इशारा

| Updated on: Dec 18, 2021 | 4:36 PM

मुंबई: कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी करतानाच शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला कर्नाटक सरकारच जबाबदार राहील असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ जारी […]

शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला कर्नाटक सरकारच जबाबदार; एकनाथ शिंदेंचा इशारा
एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘लोकनाथ’ ध्वनिचित्रफितीचे अनावरण होणार
Follow us on

मुंबई: कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी करतानाच शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला कर्नाटक सरकारच जबाबदार राहील असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ जारी करून हा इशारा दिला आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शासन होणे गरजेचे असून तसे झाले नाही तर त्यांना शिवप्रेमी जनता आपल्या पद्धतीने अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांची विटंबना करण्याचे प्रकार सीमावर्ती भागात घडले आहेत. मात्र आमच्या सहनशीलतेला देखील मर्यादा आहेत. बंगळुरू येथे घडलेल्या घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल. तसे झाल्यास त्यास सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांचं विधान दुर्देवी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्याची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार काल कर्नाटकच्या बंगळुरू शहरात घडला. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांना कठोरात कठोर शासन करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे दैवत नसून तर सकल हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

देश माफ करणार नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही. मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. कर्नाटक सरकार आणि केंद्रसरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पवार यांनी केलं.

 

संबंधित बातम्या:

Amit Shah: सहकार क्षेत्रातील पक्षपात मूकदर्शक बनून पाहणार नाही; अमित शहांचा इशारा

नाताळ, नववर्ष स्वागताचे कार्यक्रम टाळा, मुंबई महापालिकेचं आवाहन; नव्या सूचना जारी

Amit Shah: कोऑपरेटिव्ह साखर कारखान्यांचं खासगीकरण नाही, अमित शहांची ग्वाही