घरात बसून, फेसबूक लाइव्ह करून पंतप्रधान होता येतं का ? एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

जे उद्योग राज्यातून गेले ते मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे उद्योगपती येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, तुम्हा काय सुविधा पाहिजेत ? थेट विचारतो आणि अडचणी सांगा ते सोडवतो, असं त्यांना सांगतो. पण मागचं सरकार त्यांना विचारायचं की आम्हाला काय मिळेल ते आधी सांगा.

घरात बसून, फेसबूक लाइव्ह करून पंतप्रधान होता येतं का ? एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 2:42 PM

मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असं विरोधक, उद्धव ठाकरे म्हणत आहेत. आमचं जेव्हा सरकार येईल, ईडी, सीबीआय आमच्या ताब्यात असतील तेव्हा आम्ही यांच्यावर कारवाई करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. घरात बसलेले लोक, दुसऱ्याच्या घरात काय घुसणार ? आमचं सरकार येणार कुठंली स्वप्न पहात आहेत, कुठल्या मुर्खांच्या नंदनवनात आहेत ? असा खोचक सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला. घरात बसून पंतप्रधान होता येतं का ? परदेशात थंड हवा खाऊन प्रधानमंत्री बनता येतं का ? परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करून पंतप्रधान कसं बनता येईल ? आपल्याच देशाच्या पंतप्रधांनाची बदनामी दुसऱ्या देशात जाऊन करणारी व्यक्ती पंतप्रधान बनू शकतो का ? असा सवाल विचारत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

ऊन, पाऊस, हिवाळा, थंडी कशाची पर्वा न करता 24*7 मोदीजी हे देशाच्या जनतेसाठी , विकासासाठी काम करत आहेत. पूर्ण आयुषय त्यांनी जनतेसाठी वाहून घेतलं, समर्पित केलं. आई गेल्याचं दु:ख बाजूला ठेवून ते तत्काळ देशसेवेला लागले. लोकं अशा व्यक्तीला पंतप्रधान करतील की घरबशा व्यक्तीला सत्ता देतील ? घरात बसून फेसबूक लाइव्ह करणाऱ्या व्यक्तीला कोण पंतप्रधान करेल? अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराला वेग आला आहे. त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी tv9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, तसेच उद्धव ठाकरेंवरही हल्ला चढवला.

आमचं सरकार फेस टू फेस काम करणारं आहे, फक्त फेसबूक लाइव्ह करणारं नव्हे

गेल्या ५०-६० वर्षांपासून देशात काँग्रेसची सत्ता तर गेली १० वर्ष भाजप सत्तेत आहे. इतक्या वर्षांत जे काँग्रेसला जमल नाही, ते गेल्या १० वर्षातील सत्तेत मोदीजींनी करून दाखवलं. गोरगरिबांसाठी काम केलं, त्यांच्या कल्याणासाठी ते दिवसरात्र झटत आहेत. असं आमचं सरकार आहे, फेस टू फेस काम करणार आमचं सरकार आहे, फक्त फेसबूक लाइव्ह करणारं, उंटावरून शेळ्या हाकणार सरकार नव्हे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मविआ सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. जे फक्त घरात बसतील त्यांच्या नव्हे तर काम करणाऱ्यांच्या मागे आम्ही उभं राहू असं जनतेने ठरवलं आहे, आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवत आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील उद्योग गेले

भाजपमुळे महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले, असा आरोप करण्यात येतो असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. आपलं राज्य हे इंडस्ट्री फ्रेंडली आहे, कुशल मनुष्यबळ आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. जे उद्योग राज्यातून गेले ते मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे उद्योगपती येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, तुम्हा काय सुविधा पाहिजेत ? थेट विचारतो आणि अडचणी सांगा ते सोडवतो, असं त्यांना सांगतो. पण मागचं सरकार त्यांना विचारायचं की आम्हाला काय मिळेल ते आधी सांगा, आमचं काय ? असंही म्हणायचे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे उद्योग राज्यातून बाहेर गेले.

शिवसैनिकांचं खुलेआम खच्चीकरण होत होतं, ते थांबवण्यासाठी आम्ही धाडसाचं पाऊल उचललं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडावेळी नेमकं काय घडलं होतं याचा गौप्यस्फोट केला. शिवसेना आमदार सुरतला गेल्यावर शिवसेनेत धांदल उडाली होती. त्या दरम्यान त्यांची व उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली होती, अशा बातम्या समोर आल्या आहेत. त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता एकनाथ शिंदे म्हणाले की तेव्हा आम्ही बोलत गेलो, लपून छपून नव्हे खुलेआम गेलो. आमची ( शिंदे व उद्धव ठाकरे ) फोनवरून चर्चा झाली. एकीकडे ते आम्हाला परत बोलावत होते, पण दुसरीकडे ( मुंबईत) आमचे पुतळे जाळण्यात येत होते. आमची पार्टीतून हकालपट्टी करायची. एवढंच नव्हे तर त्यांची भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी चर्चादेखील सुरू होती, या लोकांना ( शिंदे गट) कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफरही त्यांनी दिली. पण त्यांच्याकडे तेव्हा होतं काय ? असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली.

शिवसैनिकांचं खुलेआम खच्चीकरण होत होतं, ते थांबवण्यासाठी, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं होतं. ते धाडसाचं होतं, त्याला हिंमत लागते, ती हिंमत आम्ही दाखवली असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Non Stop LIVE Update
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय.
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड.
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा.
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.