मोठी बातमी! समीर दाऊद वानखेडे की समीर ज्ञानदेव वानखेडे?, खरं काय?; एक्सक्ल्यूझिव्ह कागदपत्रे फक्त ‘टीव्ही9’कडे

| Updated on: Oct 25, 2021 | 3:26 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकरी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला. त्यावर समीर दाऊद वानखेडे असं लिहून फ्रॉडला इथूनच सुरुवात झाल्याचं म्हटलं. (exclusive story about ncb officer sameer wankhede)

मोठी बातमी! समीर दाऊद वानखेडे की समीर ज्ञानदेव वानखेडे?, खरं काय?; एक्सक्ल्यूझिव्ह कागदपत्रे फक्त टीव्ही9कडे
समीर वानखेडे यांच्या व्यक्तिगत आयुष्यावरच आज टीका करण्यात आली. त्यामुळे वानखेडे काहीसे त्रस्त झाले होते.
Follow us on

वाशिम: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकरी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला. त्यावर समीर दाऊद वानखेडे असं लिहून फ्रॉडला इथूनच सुरुवात झाल्याचं म्हटलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वानखेडे यांच्या नावाबाबत तर्कवितर्क लढवले गेले. एवढेच नव्हे तर ते कोणत्या जातीचे आहेत यावरही चर्चा सुरू झाली. मात्र, वानखेडे यांनी त्यांच्यावरील सर्वच आरोप फेटाळून लावले. त्यामुळे समीर वानखेडे नक्की कोण? समीर दाऊद वानखेडे की समीर ज्ञानदेव वानखेडे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याचाच घेतलेला हा धांडोळा.

नवाब मलिक यांनी आरोप केले. त्यानंतर समीर वानखेडे यांनी आरोप फेटाळले आणि माझ्या गावी जाऊन तपासा मी कोण आहे? असं आव्हानच मलिक यांना दिलं. त्यानंतर आमच्या रिपोर्टरने थेट वानखेडे यांचं गावच गाठलं आणि वानखेडेंबाबतची मूळ माहिती मिळवली.

cast certificate

वानखेडेंचे मूळ गाव कोणते?

समीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशीम जिल्हयातील रिसोड तालुक्यात येत असून वाशीम-रिसोडवरील आसेगावपासून 5 किमी आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडिलोपार्जीत शेती व घर असून त्यांचे चुलत भावंड राहतात. सध्या त्यांचे काका शंकरराव कचरूजी वानखेडे हे सेवानिवृत्त असून सध्या वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांचे मूळ कागदपत्रे बघितली असता त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीचे असल्याचं दिसून आलंय.

cast certificate

मुंबईत राहत असल्याने नाव बदललं असेल

नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे असे ट्विट केल्यानंतर वानखेडे यांनी माझ्या मूळगावी जाऊन तपासा असे सांगितल्यानंतर समीर वानखेडे यांचे काका राहत असलेल्या वाशिम येथे येऊन त्यांच्याशी संपर्क साधला. माझा भाऊ ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे मुंबईला लोखंडवाला परिसरात राहत असल्याने त्यांना टोपण नाव दिल असेल. मात्र हे राजकीय आरोप आहेत. माझ्या भावाचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हेच तर पुतण्याचे समीर ज्ञानदेव वानखेडे हेच असल्याचं शंकरराव वानखेडे यांनी सांगितलं.

cast certificate

समीरचा अभिमान

अशा प्रकारे ड्रग्स माफियांविरोधात आपला मुलगा (पुतण्या) करीत असलेल्या कारवायांचा अभिमान आहे. समीर हा आपल्या कुटुंबाचा सदस्य असल्याचा आम्हा सर्व वानखेडे कुटुंबीयांना अभिमान असल्याचे वाशीम येथील लाखाळा स्थित त्यांचे मोठे बाबा शंकरराव वानखेडे यांनी सांगितले. अधिकारी झाल्यानंतर समीर वानखेडे हे वाशीम येथील आपल्या घरी व वरूड तोफा येथे येवून गेलेले आहेत. समीर हा अत्यंत शांत, प्रेमळ आणि नि:स्वार्थी असल्याचे शंकरराव वानखेडे यांनी सांगितले.

समीर वानखेडेंची दर दोन वर्षाने गावाकडे हजेरी

गावात समीरचे येणे जाणे असते. वडील मुंबई पोलीस दलात नोकरीवर असल्याने मुंबई हेच विश्व बनलेल्या समीर वानखेडे यांनी गावांशी असलेला ऋणानुबंध कधी तुटू दिला नाही. दर दोन वर्षांनी ते गावात येत असतात. शिवाय भावकीच्या महत्वाच्या कार्यातही हजेरी लावतात, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

 

संबंधित बातम्या:

नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडेंनी फ्रॉड केला? मलिकांच्याविरोधात कोर्टात जाणार वानखेडे?

VIDEO: समीर वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावलं, खात्यांतर्गत चौकशी होणार; प्रभाकर साईलचे आरोप भोवणार?

VIDEO: समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण, खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करा, ज्येष्ठ वकिलाची पोलिसांकडे तक्रार

(exclusive story about ncb officer sameer wankhede)