AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांचे खिसेच नव्हे तर कपडेही फाडते महागडी एसी लोकल !

मध्य रेल्वेवर 56 तर पश्चिम रेल्वेवर 79 एसी लोकल धावत आहेत. या एसी लोकलच्या सिंगल जर्नी प्रवासाच्या तिकीट दरात 5 ऑगस्टपासून पन्नास टक्के कपात केल्यानंतर एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मात्र, यात सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या पिकअवरला असलेल्या फेऱ्यांना जादा प्रतिसाद मिळत आहे.

प्रवाशांचे खिसेच नव्हे तर कपडेही फाडते महागडी एसी लोकल !
aclocal.seatImage Credit source: aclocal.seat
| Updated on: Dec 20, 2022 | 4:22 PM
Share

मुंबई : मुंबईच्या एसी लोकलचे (Ac local ) महागडे भाडे आणि त्या तुलनेत मिळत असलेली सेवा याची काही सांगडच लागत नाही. या एसी लोकलमध्ये केवळ वातानुकूलित यंत्रणेशिवाय (air conditioning ) एकही अतिरिक्त सुविधा रेल्वे प्रशासनाने पुरविलेली नाही. आता एसी लोकलच्या आसनांमुळे प्रवाशांच्या महागड्या ट्राऊजर्स ( Trouser ) फाटल्या जात असल्याची तक्रारी येत आहेत. एका प्रवाशाने  या दोषपूर्ण आसनांचा व्हीडीओच ट्वीटरवर शेअर करीत आपली फाटलेली ट्राऊजर रेल्वे भरून देणार काय असा सवाल केला आहे.

रेल्वे बोर्डाने ही लक्झरीयस सेवा असल्याने तिचे भाडे फर्स्टक्लासच्या तिकीटाच्या 1.2 पट ठेवले आहे. वास्तविक फर्स्टक्लासच्या डब्यात निदान गादीची मऊ आसने तरी आहेत. परंतू या एसी लोकलना स्टेनलेस स्टीलची आसने बसविण्यात आली आहेत. त्यामुळे एसी लोकलमध्ये एअरकंडीशन यंत्रणेशिवाय एकही लक्झरी सुविधा नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. हिवाळ्यात या स्टेनलेस स्टीलच्या आसनांमुळे आणखीनच थंडावा निर्माण होत त्याचा त्रासच होत असतो.

जागरूक आणि दक्ष प्रवासी राजीव सिंघल यांना आज  पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमधून प्रवास करताना विचित्र अनुभव आला. तो त्यांनी ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ते कोच क्र. 7019 – C मधून प्रवास करताना त्यांची महागडी रेमण्ड कंपनीची ट्राऊजर्स या स्टीलच्या आसनांच्या फटीत अडकून पाठच्या बाजूस फाटली. त्यामुळे त्यांना प्रवास करताना लाजिरवाणे वाटले. त्यांनी या आसनाला एका बाजूला वेल्डींगच न केल्याचे निदर्शनास आणले आहे. त्यांनी यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे कारशेड इनचार्ज यांना यासंदर्भात खडसावले. तसेच ट्वीटरवरही तक्रार करीत ही फॉल्टी सिट बदलण्याची किंवा दुरूस्त करण्याची मागणीही पश्चिम रेल्वे प्रशासनाला केली आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना